आमच्याविषयी

शेतीमध्ये रसायनांचा वाढत असलेला वापर व त्यांचे जमिनीच्या तसेच मानवी आरोग्यावर होणारे दुष्परीणाम टाळण्यासाठी त्यांचा वापर मर्यादित करणे गरजेचे आहेच पण त्याचबरोबर रासायनीक खते व पिक संरक्षण रसायनांना योग्य ते सेंद्रिय / नैसर्गिक पर्याय उपलब्ध करुन देणेही तितकेच महत्वाचे आहे.

शेतकर्‍यांमध्ये सेंद्रिय शेतीविषयी वाढत असलेली जागरुकता व ग्राहकांकडून विषमुक्त अन्नधान्ये, फळे, भाजीपाला यांची वाढत असलेली मागणी लक्षात घेता शेतकर्‍यांकडून सेंद्रिय / नैसर्गिक खते, जैविक खते, बुरशीनाशके, किटकनाशके, विविध प्रकारचे सापळे तसेच मित्र किडींचा वापर वाढू लागला आहे. त्यामुळे येणार्‍या काळात या उत्पादनांची वाढणारी गरज लक्षात घेता उत्कृष्ठ दर्जाची उत्पादने योग्य दरात शेतकर्‍यांना पुरवीणे महत्वाचे आहे.

या सर्व गोष्टींचा विचार करुन, सोनकुळ अ‍ॅग्रो ग्रुप गेल्या २५ वर्षांपासून नाशिक येथे शास्त्रीयदृष्ट्या काटेकोरपणे ब्रॅंडेड सेंद्रिय खते, मशरुम कंपोस्ट, पेंडी व पेंडींची मिश्रणे, वनस्पती अर्क, चिकट तसेच कामगंध सापळे, जैविक खते, बुरशीनाशके, किटकनाशके, सुत्रकृमीनाशके, विषाणुजन्य किटकनाशके तसेच मित्र किडी यांचे कृषीसंबंधीत विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन करत आहे.

त्याचबरोबर माती, पाणी, पानदेठ तसेच खते यांच्या परिक्षणाची शेतक-यांना असलेली गरज ओळखुन आमच्या प्रयोगशाळेमार्फत अत्याधुनिक पृथक्करण यंत्रणा व दर्जेदार पृथक्करण रसायनांचा वापर करुन तज्ञ व अनुभवी तंत्रज्ञांकडून पृथक्करण तसेच पृथक्करण अहवालावर आधारीत शिफारशीं सुयोग्य दरात पुरविल्या जातात.

सोनकुळ अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज द्वारे उत्पादीत दर्जेदार सेंद्रिय / नैसर्गिक उत्पादनांचा वापर करुन पुरवील्या जाणार्‍या सेवांचा लाभ घेऊन विषमुक्त व रसायनविरहीत शेतीचा जागर आपण आमच्यासोबत कराल याची आम्हाला खात्री आहे.

सोनकुळ अ‍ॅग्रो ग्रुप

एकात्मीक अन्नद्रव्ये व कीड रोग व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा सुयोग्य अवलंब करून विषमुक्त अन्नधान्ये, फळे व भाजीपाला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी निर्माण करण्यासाठी दर्जेदार कृषी निविष्ठा व सेवा आवश्यक आहेत.

सोनकुळ अ‍ॅग्रो ग्रुप दर्जेदार सेवा व निविष्ठा पुरविण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कृषीक्षेत्राशी संबंधीत विविध विषयांचे संशोधक तसेच संशोधन संस्था यांचा सल्ला तसेच मार्गदर्शन घेत असतो. यासोबतच विविध कृषी विषयातील शास्त्रज्ञ व इतर संशोधन संस्थांशी सोनकुळ अ‍ॅग्रो ग्रुपने करार केलेले असल्याने त्यांच्या ज्ञानाचा उपयोग सेवा व उत्पादनांचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच नवनवीन सेवा व उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी केला जातो.

Back to Top