अ‍ॅम स्टार

Contents

Total Amino Acids: 80 %
Fillers and Carriers: 20 %

अ‍ॅम स्टार पिकांना सर्वांगीण वाढीसाठी आवश्यक असणार्‍या नैसर्गीक अ‍ॅमिनो आम्लांचे मिश्रण आहे. याच्या वापराने फळे, फुले तसेच भाजीपाला पिकांचा रंग, दर्जा, आकार, टिकाऊपणा तसेच उत्पादनात वाढ होते.

अ‍ॅम स्टारचा वापर केल्याने पिकांच्या वाढक्षमतेला नैसर्गीकरित्या चालना मिळून त्यांची किड व रोग तसेच वातावरणातील बदलांना प्रतिकार करण्याची शक्ती वाढते.

अ‍ॅम स्टारचे फायदे

  • अ‍ॅम स्टार पिकांना आवश्यक असणार्‍या अन्नद्रव्यांच्या कणांना बांधून ठेवून (चिलेशन) पिकांच्या मुळांशी उपलब्ध करुन देते. त्यामुळे पिकांद्वारे या अन्नद्रव्यांचे शोषण सहजपणे होते.
  • अन्नद्रव्यांचे शोषण व्यवस्थित झाल्यामुळे पिकांच्या एकूण वाढीस चालना मिळून अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यास मदत होते.
  • अ‍ॅम स्टार मुळे जमिनीत असणार्‍या सुक्ष्म जिवाणूंच्या वाढीससुद्धा चालना मिळून त्यांच्या संख्येत वाढ होते. परिणामी त्यांची क्रियाशीलता वाढून जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होते.
  • अ‍ॅम स्टार च्या वापराने पिके किड, रोग, तापमानातील चढ-उतार, पाण्याची कमतरता, पुनर्लागवड यादरम्यान पडणार्‍या ताणांचा प्रतिकार अधिक कार्यक्षमपणे करतात.
  • अ‍ॅम स्टार मुळे पानांमधील हरितद्रव्याचे प्रमाण वाढून प्रकाश संश्लेषणाची क्रिया अधिक जोमाने होते. परिणामी पिकांच्या भरघोस वाढीस मदत होते.
  • अ‍ॅम स्टार पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी पुरक तसेच प्रेरक म्हणून काम करते.
  • अ‍ॅम स्टार मुळे फळे, फुले तसेच भाजीपाला पिकांच्या रंग, दर्जा, आकार, साठवनक्षमता तसेच उत्पादनात वाढ होते.

वापरण्याचे प्रमाण

जमिनीतून

प्रती एकर ५०० ते १००० ग्रॅम अ‍ॅम स्टार सेंद्रिय किंवा रासायनीक खतांमध्ये मिसळून द्यावे.

ठिबक सिंचनामधून

प्रती एकर ५०० ग्रॅम अ‍ॅम स्टार पाण्यामध्ये विरघळवून ठिबक सिंचनाद्वारे मुळांशी द्यावे.

आळवणीसाठी

५ ग्रॅम अ‍ॅम स्टार प्रती लिटर पाण्यात मिसळून मुळांजवळ आळवणी करावी.

फवारणीमधून

२ ग्रॅम अ‍ॅम स्टार प्रती लिटर पाण्यामध्ये फवारणीसाठी वापरावे. चांगल्या परिणामांसाठी फवारणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशीरा करावी.

उपलब्धता

५०० ग्रॅम / १००० ग्रॅम

Back to Top