भू परिपूर्णा® (निंबोळी पावडर)

सेंद्रिय शेतीमध्ये विविध प्रकारच्या खाद्य तसेच अखाद्य तेलबियांच्या पेंडींचा वापर अन्नद्रव्यांचा नैसर्गिक स्रोत म्हणून केला जातो. या तेलबियांमधील अन्नद्रव्यांसोबतच त्यामध्ये असलेले किड व रोगप्रतिकारक गुणधर्म व त्यामधील सेंद्रिय कर्ब पिकांच्या एकंदर वाढीसाठी उपयुक्त ठरतात. निंबोळी व निंबोळीपासून तयार केलेली उत्पादने त्यांच्यामधील विविध गुणधर्मांमुळे मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत.

उत्कृष्ठ दर्जाच्या निंबोळी मधील तेल किंवा अ‍ॅझेडीरॅक्टीन वेगळे न करता सुकलेल्या निंबोळीला भरडून भू परिपूर्णा® पावडर तयार करण्यात आलेली आहे.

निंबोळीमध्ये अंगभूत असणारे किटक व बुरशीनाशक गुणधर्म व पिकांना आवश्यक असणारे मुख्य, दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये भू परीपुर्णा® मधुन मिळत असल्याने निंबोळी अथवा इतर पेंडींपेक्षा भू परिपूर्णा® चा वापर जास्त फायदेशीर आहे.

भू परिपूर्णा® निंबोळी पावडरमधील घटक

घटक प्रमाण
अ‍ॅझॅडिरॅक्टीन ७०० पी.पी.एम.
तेलाचे प्रमाण ४.० – ५.० %
सेंद्रिय कर्ब ३५ – ४० %
नत्र ४.० – ५.० %
स्फुरद १.० – २.० %
पालाश १.० – २.५ %
प्रथिने ३० - ३५ %

या शिवाय ह्यामध्ये पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.

ह्या घटकांचे प्रमाण प्रातिनिधीक स्वरुपाचे असून यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.

भू परिपूर्णा® चे फायदे

  • भू परिपूर्णा® मधील निंबोळी तेल व त्यामधील अ‍ॅझेडीरॅक्टीन हा घटक जमिनीमधील वाळवी, हुमणी, मिलीबग (पिठ्या ढेकून) यासारख्या किडींपासुन पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे.
  • या शिवाय विविध प्रकारच्या रोगकारक बुरशींपासून पिकाला वाचविण्यासाठी भू परिपूर्णा® हा संपूर्णतः सेंद्रीय पर्याय आहे.
  • भू परिपूर्णा® मधील मुख्य, दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये हळूहळू पिकांच्या वाढीसाठी उपलब्ध होत असल्याने दीर्घकाळापर्यंत अन्नद्रव्यांचा पुरवठा चालू राहतो.
  • जमिनीमधील उपयुक्त सुक्ष्म जिवांच्या वाढीसाठी खाद्य म्हणुन भू परिपूर्णा® वापरले जात असल्याने जमिनीतील सुक्ष्म जिवाणूंची संख्या तसेच कार्यक्षमता वाढते.
  • यामुळे जमिनीची सच्छिद्रता वाढून सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
  • वापरल्या जाणार्‍या रासायनीक खतांमधील अन्नद्रव्यांचा होणारा र्‍हास कमी होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते.
  • जमिनीचे भौतीक, रासायनीक व जैविक गुणधर्म सुधारुन सुपिकतेमध्ये वाढ होते.
  • रासायनीक नत्रयुक्त खतांमधील (उदा. युरीया) नत्र जमिनीतील सुक्ष्म जिवाणूंमुळे तसेच पाण्यामध्ये विरघळून त्याचा र्‍हास होण्याचे प्रमाण जास्त असते. भू परिपूर्णा® अशा नत्र खतांसोबत मिसळून वापरल्यामुळे या खतांच्या र्‍हासामध्ये २५ % पर्यंत घट होऊन त्यातील अन्नद्रव्ये जास्तीत जास्त प्रमाणात पिकाला उपलब्ध होतात.

वापरण्याचे प्रमाण

एकरी ३०० ते ५०० किलो शक्यतो लागवडीच्या वेळी जमिनीतून द्यावे.

या शिवाय रासायनिक खत देताना १:१ या प्रमाणात मिसळून द्यावे.

उपलब्धता

२५ किलो बॅग

Back to Top