भू – समृद्धी® (पेंड मिश्रण)

पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणार्‍या मुख्य, दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्याचा सेंद्रीय स्रोत म्हणून विविध प्रकारच्या खाद्य तसेच अखाद्य पेंडींचा वापर केला जातो. विविध प्रकारच्या पेंडींचे लाभकारक गुणधर्म एकत्रीतपणे भू समृध्दी® (पेंड मिश्रण) या उत्पादनामधुन आम्ही उपलब्ध करत आहोत. निंबोळी, एरंडी, मोह, करंज तसेच शेंगदाणा पेंडीच्या योग्य मिश्रणातून तयार केलेले भू समृध्दी® (पेंड मिश्रण) हे उत्पादन पिकांची वाढ, गुणवत्ता तसेच उत्पादनासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

भू समृध्दी® पेंडमिश्रणामधील घटक

घटक प्रमाण
सेंद्रिय कर्ब ३५ - ४० %
नत्र ४.० – ५.० %
स्फुरद (P2O5) १.० – २.० %
पालाश (K2O) १.० – २.५ %
प्रथिने ३० – ३५ %
तेलाचे प्रमाण ४.० – ५.० %
कार्बन नत्र गुणोत्तर < १०

या शिवाय ह्यामध्ये पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.

ह्या घटकांचे प्रमाण प्रातिनिधीक स्वरुपाचे असून यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.

फायदे

  • भू समृध्दी® ५ प्रकारच्या पेंडीचे (तेलासहीत व तेलरहीत) सुयोग्य मिश्रण असुन या सर्व पेंडींचे फायदे एकत्रीतपणे मिळतात.
  • जमिनीच्या सेंद्रीय कर्बामध्ये भर घालुन जमिनीची सुपिकता वाढते.
  • जमिनीचे भौतीक, रासायनिक तसेच जैविक गुणधर्म सुधारुन उत्पादन वाढीसाठी मदत होते.
  • जमिनीतील सुक्ष्म जिवाणूंच्या वाढीसाठी व कार्यक्षमतेसाठी पोषक वातावरण तयार होते.
  • पिकांना आवश्यक असणारी सर्व अन्नद्रव्ये नैसर्गिक स्वरुपात उपलब्ध होतात.
  • रासायनिक खतांसोबत वापरल्यास खतांद्‍वारे दिलेल्या अन्नद्रव्याचे शोषण वाढून खतांवरचा खर्च कमी होतो.
  • रासायनिक खतांच्या अतिवापराने खराब होत असलेल्या जमिनीचे आरोग्य सुधारते.

वापरण्याचे प्रमाण

एकरी ३०० ते ५०० किलो शक्यतो लागवडीच्या वेळी जमिनीतून द्यावे.

या शिवाय रासायनिक खत देताना १:१ या प्रमाणात मिसळून द्यावे.

उपलब्धता

२५ किलो बॅग

Back to Top