भू – समृद्धी एरंडी पेंड

भू समृध्दी एरंडी पेंड एक सेंद्रीय खत असुन एकात्मीक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये रासायनिक खतांचा वापर व त्यांचे दुष्परीणाम कमी करुन पिकांना नैसर्गिकरीत्या अन्नद्रव्ये पुरवठा करण्यासाठी उपयुक्त आहे. भू समृध्दी एरंडी पेंड संपूर्णतः सेंद्रीय असल्याने यामधील अन्नद्रव्ये नैसर्गिक स्वरुपात पिकांना उपलब्ध होतात. पिकांच्या गरजेनुसार ही अन्नद्रव्ये हळूहळू उपलब्ध होत असल्याने दिर्घकाळापर्यंत चांगला परीणाम मिळतो.

भु समृद्धी एरंडी पेंड मधील घटक

घटक प्रमाण
नत्र ५.४२ %
स्फुरद (P2O5) १.५६ %
पालाश (K2O) १.२४ %
प्रथिने ३३.८७%

या शिवाय ह्यामध्ये पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.

ह्या घटकांचे प्रमाण प्रातिनिधीक स्वरुपाचे असून यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.

भू समृध्दी एरंडी पेंडचे फायदे

  • भू समृध्दी एरंडी पेंड सेंद्रीय शेतीमध्ये मुख्य, दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये पुरवठयाला उत्तम पर्याय आहे.
  • जमिनीतील सेंद्रीय कर्बामध्ये वाढ करुन जमिनीची सुपिकता वाढवते.
  • जमिनीतल हितकारक सुक्ष्मजीव तसेच गांडूळांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते.
  • जमिनीचा सामू नियंत्रणात राहून अन्नद्रव्यांचे पिकांना मुळांद्‍वारे शोषण वाढते.
  • जमिनीचे भौतीक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारतात.
  • पिकांची किड व रोग प्रतीकार क्षमता वाढते.
  • रासायनिक खतांसोबत वापरल्यास अन्नद्रव्यांचा र्‍हास कमी होऊन त्यांची उपलब्धता वाढते.
  • यामध्ये नैसर्गिक स्वरुपात प्रथिने असल्याने सुक्ष्मजिवाणूंच्या वाढीसाठी एक उत्तम खाद्य म्हणून उपयोगी ठरते.

वापरण्याचे प्रमाण:

एकरी ३०० ते ५०० किलो शक्यतो लागवडीच्या वेळी जमिनीतून द्यावे.

या शिवाय रासायनिक खत देताना १:१ या प्रमाणात मिसळून द्यावे.

उपलब्धता:

५० किलो बॅग

Back to Top