भू – समृद्धी® तेलरहीत भूईमूग पेंड

भू समृध्दी® तेलरहीत भूईमूग पेंड उच्च दर्जाचे प्रथिनांनी तसेच अन्नद्रव्यांनी समृध्द असे सेंद्रीय खत आहे. पिकांना आवश्यक असणार्‍या अन्नद्रव्यांसोबतच विविध प्रकारची पिक वाढ संप्रेरके यामध्ये असल्याने रासायनिक खतांना पर्याय म्हणून किंवा रासायनिक खतांसोबत मिसळून याचा वापर करता येतो. भू समृध्दी® तेलरहीत भूईमूग पेंडीच्या वापराने जमिनीची सुपिकता वाढून पिकांच्या उत्पादनात वाढ होते.

भु समृद्धी® तेलरहीत भूईमूग पेंडी मधील घटक

घटक प्रमाण
नत्र ५ – ७ %
स्फुरद (P2O5) १ – ३ %
पालाश (K2O) १ – ३ %
प्रथिने ४० – ४५ %

या शिवाय ह्यामध्ये पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.

ह्या घटकांचे प्रमाण प्रातिनिधीक स्वरुपाचे असून यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.

भू समृध्दी® तेलरहीत भूईमूग पेंडीचे फायदे

  • भू समृध्दी® तेलरहीत भूईमूग पेंडीमध्ये ४७.८७% पर्यंत प्रथिने असल्यामुळे जमिनीतील सुक्ष्मजिवाणूंची संख्या तसेच कार्यक्षमता वाढीसाठी प्रोत्साहन मिळते.
  • हीतकारक सुक्ष्मजिवाणूंची संख्या व कार्यक्षमता वाढल्याने अन्नद्रव्यांची उपलब्धता व पिकांच्या मुळांद्‍वारे त्यांचे शोषण वाढते.
  • सेंद्रीय स्वरुपातील मुख्य, दुय्यम तसेच सुक्ष्म अनद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात.
  • भू समृध्दी® तेलरहीत भूईमूग पेंड पावडर स्वरुपात असल्याने अन्नद्रव्यांची उपलब्धता जलद गतीने होते.
  • जमिनीतील सेंद्रीय कर्बामध्ये वाढ होऊन जमिनीचे भौतीक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारतात.
  • रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी भू समृध्दी® तेलरहीत भूईमूग पेंडीचा वापर त्यांच्या सोबत सहजपणे करता येतो.

वापरण्याचे प्रमाण:

एकरी ३०० ते ५०० किलो शक्यतो लागवडीच्या वेळी जमिनीतून द्यावे.

या शिवाय रासायनिक खत देताना १:१ या प्रमाणात मिसळून द्यावे.

उपलब्धता:

५० किलो बॅग

Back to Top