भू – समृद्धी® (सेंद्रिय खत )

भू समृद्धी® सेंद्रिय खत शेणखताला एक उत्तम पर्याय असून शेणखताच्या तुलनेत भू समृद्धी® सेंद्रिय खत अन्नद्रव्ये, सुक्ष्म जिवाणू व पिक वाढीसाठी लागणार्‍या घटकांनी समृद्ध आहे. भू समृद्धी® सेंद्रिय खत मशरूम (अळींबी) उत्पादन केल्यानंतर मिळणार्‍या कच्च्या मालापासून प्रक्रिया करून तयार केलेले आहे. मशरूम उत्पादन करताना वापरल्या जाणार्‍या पोषक पदार्थांचा समावेश भू समृद्धी® सेंद्रिय खतामध्ये असल्याने हे ईतर सेंद्रिय खतांपेक्षा दर्जामध्ये वरचढ आहे.

भू समृद्धी® सेंद्रिय खतामध्ये पिकांना आवश्यक असणारी मुख्य, दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये नैसर्गीकरित्या उपलब्ध आहेत.

भू समृद्धी® सेंद्रिय खताचे फायदे

  • भू समृद्धी® सेंद्रिय खत संपूर्णतः कुजलेले भरखत असून याच्या वापराने जमिनीचे जैविक तसेच भौतिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
  • भू समृद्धी® सेंद्रिय खतामधून पिकांना आवश्यक असणारे सर्व अन्नघटक नैसर्गीकरित्या उपलब्ध होत असल्याने पिकांची व मुळांची जोमाने वाढ होते.
  • अन्नद्रव्यांसोबतच इतर पोषक घटक भू समृद्धी® सेंद्रिय खतामधून मिळाल्याने पिकांचे आरोग्य उत्तम राहून त्यांची कीड व रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • भू समृद्धी® सेंद्रिय खताच्या वापराने पाने, फुले व फळांची गळ थांबून फळांना आकर्षक रंग व चमक येते.
  • जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता भू समृद्धी® सेंद्रिय खताच्या वापराने वाढून अधिक काळापर्यंत जमिनीत ओलावा टिकून रहातो.

वापरण्याची पद्धत

शिफारस केलेल्या प्रमाणात मातीच्या वरच्या थरामध्ये मिसळावे व नंतर हलके पाणी द्यावे.

  • कुंडीतील झाडे (फुले/भाजीपाला/शोभीवंत झाडे): ५० ते १०० ग्रॅम प्रती झाड आठवड्यातून एकदा.
  • बागेतील झाडे / वृक्ष : १०० ते २०० ग्रॅम प्रती झाड आठवड्यातून एकदा.
  • परसबाग व लॉन: ५०० ते १००० ग्रॅम प्रती वर्ग मिटर महीन्यातून एकदा

उपलब्धता :

१ किलो पाउच / ५ किलो बॅग

Back to Top