बायो फर्टीसील

अन्नद्रव्यांचे मुळांद्वारे शोषण व त्यांचे वनस्पतींच्या शरिरातील वहन वाढवण्याचे महत्वाचे कार्य बायो फर्टीसील मुळे होते. बायो फर्टीसील विविध किडी तसेच रोगांपासून बचाव करण्याची क्षमता पिकांना प्रदान करते. पिकांना शोषणासाठी योग्य अशा स्वरुपात बायो फर्टीसील उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामुळे फळांना चकाकी तसेच पानांना गर्द रंग प्राप्त होतो. विविध अन्नद्र्व्यांची उपलब्धता वाढवून प्रकाशसंश्लेषण, पुनुरुत्पादन तसेच फलधारणा पक्रींयांना चालना मिळते. यामुळे पेशीभित्तीकेला एक प्रकारची मजबूती मिळत असल्याने पिकांचे कीड व रोगांपासून संरक्षण होतो.

फायदे

  • पानांच्या पृष्ठभागाला मजबूती प्रदान करते. त्यामुळे रस शोषणा-या किडींपासून पिकांचा बचाव होतो.
  • पेशीभित्तीकेला मजबूती मिळते तसेच प्रकाशसंश्लेषण क्रियेचा वेग वाढतो.
  • पिकांना एक प्रकारची प्रतीकारशक्ती मिळत असल्याने रासायनीक कीटकनाशकांच्या फवारण्या कमी होऊन किटकनाशक अंशमुक्त उत्पादन शक्य होते.
  • जैविक तसेच अजैविक ताणांपासून पिकांचे संरक्षण होऊन पिकांच्या आरोग्यात सुधारणा होते.
  • पे-यांमधील अंतराचा समतोल राखण्यास मदत करून परिणामी फुलधारणा शक्ती वाढते.
  • फुटवे / फांदयांची संख्या वाढवून पिकांचे लोळण्यापासून रक्षण करते.
  • पिक लवकर तयार होण्यास मदत करुन फळे, फुले व भाजीपाला यांचा दर्जा तसेच साठवणक्षमतेमध्ये वाढ होते.
  • मुख्य तसेच सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापराची कार्यक्षमता वाढवते.

वापरण्याचे प्रमाण

बायो फर्टीसील सर्व प्रकारच्या सेंद्रीय तसेच रासायनीक खतांसोबत वापरता येते.

जमीनीतून (प्रती एकर)

१ ते २ किलो बायो फर्टीसील सेंद्रीय किंवा रासायनीक खतांसोबत मिसळून दयावे.

ठिंबक सिंचनामधून (प्रती एकर)

१ ते २ किलो बायो फर्टीसील पाण्यामध्ये विरघळवून दयावे.

आळवणींमधून

५ ते १० ग्रॅम बायो फर्टीसील १ लिटर पाण्यात विरघळवून मुळांच्या जवळ आळवणीद्वारे द्यावे.

उपलब्ध पॅकींग

१००० ग्रॅम

Back to Top