बायो फ्लोरा

झाडांच्या पोषणासाठी सर्वसमावेशक अन्नपुरवठा

बायो फ्लोरामध्ये झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असे मुख्य, दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये नैसर्गिक स्वरुपात आहेत.परसबागेतील व शोभीवंत झाडांसाठी खास तयार केलेले हे मिश्रण झाडांची वाढ, फुले तसेच फळधारणा व झाडांचे एकंदर आरोग्य सुधारते.

फायदे:

  • झाडांच्या वाढीसाठी आवश्यक मुख्य, दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्यांचा उत्कृष्ट स्त्रोत.
  • नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले असल्याने संपूर्णतः सुरक्षीत व विषमुक्त.
  • झाडांची मुळे, पाने, फांद्या, फुले तसेच फळांची वाढ करते.
  • मातीची जडनघडन व आरोग्य सुधारुन दिर्घकाळापर्यंत परिणाम देते.
  • सर्व प्रकारच्या कुंडीतील झाडे, बागेतील झाडे, लॉन व परसबागेसाठी उपयुक्त.

वापरण्याची पद्धत:

शिफारस केलेल्या प्रमाणात मातीच्या वरच्या थरामध्ये मिसळावे व नंतर हलके पाणी द्यावे.

  • कुंडीतील झाडे (फुले/भाजीपाला/शोभीवंत झाडे): ५० ते १०० ग्रॅम प्रती झाड आठवड्यातून एकदा.
  • बागेतील झाडे / वृक्ष : १०० ते २०० ग्रॅम प्रती झाड आठवड्यातून एकदा.
  • परसबाग व लॉन: ५०० ते १००० ग्रॅम प्रती वर्ग मिटर महीन्यातून एकदा

उपलब्धता :

५०० ग्रॅम

Back to Top