बायो फ्रेश

Contents

Fulvic Acid – 60 %
Fillers and Carriers – 40%

बायो फ्रेश संपुर्णतः नैसर्गीक, बिनविषारी व दमदार वनस्पती वाढ प्रेरक आहे. याचा वापर केल्याने पिकांमधील जैवरासायनिक क्रिया तसेच जमिनीतील सुक्ष्म जिवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. परिणामी पिकांच्या वाढीस चालना मिळून अन्नद्रव्यांचे शोषण, पिकांची प्रतिकारक्षमता, दर्जा तसेच उत्पादनात वाढ होते.

बायो फ्रेश चे फायदे

  • बायो फ्रेश पिकांमधील पेशी विभाजनास व पेशीवाढीस चालना देते त्यामुळे पाने, फुले, फळे तसेच मुळांची वाढ होते.
  • बायो फ्रेश मुळे पिकांची प्राणवायू शोषणक्षमता तसेच पानांमधील हरितद्रव्य यामध्ये वाढ होते, त्याचबरोबर मुळांद्वारे अन्नद्रव्य शोषणक्षमता वाढते.
  • जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये विरघळवण्याची खास क्षमता बायो फ्रेश मध्ये असल्याने पिकांना आवश्यक अन्नद्रव्ये शोषणासाठी वेगाने उपलब्ध होतात.
  • बायो फ्रेश ढगाळ वातावरणातसुद्धा प्रकाश संश्लेषण क्रियेला चालना देते यामुळे वनस्पतींच्या वाढीसाठी अडथळा येत नाही.
  • बायो फ्रेश नैसर्गीक चिलेटींग एजंट असल्याने अन्नद्रव्यांना धरून ठेवते व पिकांच्या मुळांना शोषणयोग्य स्वरुपात वेळोवेळी उपलब्ध करुन देत असल्याने अन्नद्रव्यांचे शोषण वाढते.
  • बायो फ्रेश मुळे पिकांची पाण्याचा ताण सहन करण्याची शक्ती वाढते.
  • बायो फ्रेश जमिनीतील हानीकारक रसायनांना वेगाने कुजवून जमिनीचे प्रदूषण कमी करते.
  • बायोफ्रेश च्या वापराने पिकांची पर्णरंध्रे उघडण्याची क्रिया वाढते. त्यामुळे पिकांच्या श्वसनक्रियेत वाढ होते. त्याचा चांगला परिणाम पिकांच्या वाढीवर होतो.
  • बायो फ्रेश जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या श्वसनक्रियेला उत्तेजन देते यामुळे जिवाणूंची कार्यक्षमता वाढते.
  • बायो फ्रेश पिकांमधील जैवरासायनीक प्रक्रीयांना चालना देत असल्याने पिकांची प्रतिकारक्षमता वाढते.

वापरण्याचे प्रमाण

जमिनीतून

प्रती एकर ५०० ते १००० ग्रॅम बायो फ्रेश सेंद्रिय किंवा रासायनीक खतांमध्ये मिसळून द्यावे.

ठिबक सिंचनामधून

प्रती एकर ५०० ग्रॅम बायो फ्रेश पाण्यामध्ये विरघळवून ठिबक सिंचनाद्वारे मुळांशी द्यावे.

उपलब्धता

१००० ग्रॅम

Back to Top