बायो ग्रोथ

Contents

Alginic Acid: 18 %
Organic Matter: 55 %
Fillers and Carriers: 27 %

बायो ग्रोथ उत्कृष्ठ प्रतीच्या समुद्री शैवालापासून तयार केलेला नैसर्गीक अर्क असून यामधील पोषक घटक पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी प्रेरक म्हणून काम करतात. बायो ग्रोथच्या वापराने वनस्पतींच्या पेशीविभाजनास चालना मिळते तसेच पिकांची प्रतिकारशक्ती वाढून अजैविक ताणांपासून संरक्षण होते. जमिनीचे आरोग्य सुधारणेसाठी बायो ग्रोथ हा एक उत्तम नैसर्गीक पर्याय आहे.

बायो ग्रोथ चे फायदे

  • बायो ग्रोथ जमिनीची घडण सुधारून वापरलेल्या सेंद्रिय तसेच रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवते.
  • पिकांना लागणारी अन्नद्रव्ये व वाढीसाठी लागणारे इतर घटक बायो ग्रोथमुळे नैसर्गीक स्वरुपात उपलब्ध होतात.
  • बायो ग्रोथ अन्नद्रव्यांना जमिनीत धरून ठेवून (चिलेशन) पिकांच्या मुळांना वेळोवेळी उपलब्ध करून देते.
  • बायो ग्रोथ मुळे झाडांच्या खोड, मुळे, फांद्या तसेच पानांची वाढ होऊन प्रकाश संश्लेषण क्रियेला चालना मिळते.
  • तापमानातील चढउताराला तोंड देण्याची पिकांची क्षमता बायो ग्रोथच्या वापराने वाढते.
  • बायो ग्रोथ मुळे बियाण्यांची अंकुरणक्षमता वाढते तसेच रोपांना पुनर्लागवडीच्या वेळी पडणारा ताण सहन करण्याची क्षमता वाढते.
  • बायो ग्रोथच्या वापराने फळांचा आकार, वजन व दर्जामध्ये लक्षणीय वाढ होते.
  • बायो ग्रोथ मुळे फुलांची संख्या वाढून फुलगळ व फळांची गळ थांबवली जाते.
  • वातावरणातील बदलांपासून बायो ग्रोथच्या वापराने पिकांचे संरक्षण होऊन त्यांची किड व रोग प्रतीकारक्षमता वाढते.
  • बायो ग्रोथ जमिनीतील उपयुक्त जिवाणूंसाठी खाद्य म्हणून काम करते. परिणामी त्यांच्या संख्येत वाढ होऊन जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

वापरण्याचे प्रमाण

जमिनीतून

प्रती एकर ५०० ते १००० ग्रॅम बायो ग्रोथ सेंद्रिय किंवा रासायनीक खतांमध्ये मिसळून द्यावे.

ठिबक सिंचनामधून

प्रती एकर ५०० ग्रॅम बायो ग्रोथ पाण्यामध्ये विरघळवून ठिबक सिंचनाद्वारे मुळांशी द्यावे.

फवारणीमधून

२ ग्रॅम बायो ग्रोथ प्रती लिटर पाण्यामध्ये फवारणीसाठी वापरावे. चांगल्या परिणामांसाठी फवारणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशीरा करावी.

उपलब्धता

५०० ग्रॅम / १००० ग्रॅम

Back to Top