बायो फेरो BC वेलवर्गीय पिकांवरील फळमाशी

घटक:

Bactrocera cucurbitae कामगंध

ओळख व जीवनचक्र

फळमाशी पिवळसर सोनेरी असून, आकाराने घर-माशीपेक्षा थोडी मोठी असते.अळ्या फिकट पांढऱ्या रंगाच्या असतात. फळमाशीची एक मादी तिच्या जीवनकाळात फळाच्या सालीखाली पुंजक्‍यात ५०० ते १००० अंडी देते. अंडी घातल्यानंतर त्यातून ३ते ४ दिवसांत पांढऱ्या रंगाच्या आणि डोक्‍याकडे निमुळत्या अशा अळ्या बाहेर येतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या फळाच्या गरावर उपजीविका करतात. अशी फळे कुजतात. फळे खाण्यायोग्य राहत नाहीत. अळी अवस्था ११ ते १५ दिवसांची, तर कोष अवस्था ८ ते ११ दिवसांची असते. प्रौढ माशी ४ ते ५महिने जगते. अशा प्रकारे एका वर्षात फळमाशीच्या ८ ते १० पिढ्या पूर्ण होतात

नुकसानाचा प्रकार : फळमाशी फळांच्या उत्पादित भागाचे नुकसान करते. अंडी घातलेली जागा तांबूस तपकिरी दिसते. आळ्या फळातील गरावर उपजीविका करतात, त्यामुळे फळे सडतात. गळून पडतात. काही फळे बाहेरून सुरेख दिसतात; परंतु आतून खराब झालेली असतात.

पिके : कलिंगड, खरबूज, दुधी भोपळा, कोहळा, काकडी, दोडका, कारली, टिंडा, पडवळ

आर्थिक नुकसान पातळी : ५ टक्के फळे खराब झालेली आढळल्यास

कामगंधासोबत वापरावयाचा सापळा : फ्रुट फ्लाय ट्रॅप

सापळ्यांची संख्या (प्रती एकर): ८-१०

कामगंध बदलण्याचा कालावधी : ६० दिवस

Back to Top