बायो फेरो BDBactrocera dorsalis (फळझाडांवरील फळमाशी)

घटक:

Batrocera dorsalis कामगंध

फळमाशीची ओळख व जीवनचक्र

माशी पिवळसर सोनेरी रंगाची आणि आकाराने घर माशीपेक्षा थोडी मोठी असते. अळ्या फिक्कट पांढऱ्या रंगाच्या असतात. फळमाशीची एक मादी तिच्या जीवनकाळात ५०० ते १००० अंडी देते. अंडी घातल्यानंतर त्यातून ३ ते ४ दिवसांत अळ्या बाहेर येतात. अळी अवस्था ११ ते १५ दिवसांची तर कोष अवस्था ८ ते ११ दिवसांची असते. प्रौढ माशी ४ ते ५ महिने जगते. अशा प्रकारे एका वर्षात फळमाशीच्या ८ ते १० पिढ्या पूर्ण होतात.

नुकसानीचा प्रकार

फळमाशी वर्षभर कमी अधिक प्रमाणात इतर फळपिकांवर उपजीविका करत असते. परंतु आंबा किंवा इतर फळांच्या हंगामामध्ये फळमाश्‍यांची संख्या वाढते. मादी फळमाशी तिच्या अंडनलिकेच्या साह्याने फळाच्या सालीखाली पुंजक्‍यात अंडी घालते. तेथेच पांढऱ्या रंगाच्या आणि डोक्‍याकडे निमुळत्या अशा लहान अळ्या तयार होतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या फळाच्या गरावर उपजीविका करतात. त्यामुळे अशी फळे कुजतात. अळीची पूर्ण वाढ झाल्यानंतर अळ्या जमिनीत कोषावस्थेत जाते. त्यामधून फळमाशीचे प्रौढ म्हणजेच माश्‍या बाहेर येऊन पुन्हा अंडी घालतात. फळमाशीने प्रादुर्भावीत फळांची गुणवत्ता कमी होते. बाजारमूल्य मिळत नाही तसेच फळे खाण्यायोग्य राहत नाही.

पिके: पपई, पेरु, आंबा, अंजीर, लिंबू, संत्री, मोसंबी, द्राक्षे, डाळींब, आंबा, चीकू.

कामगंधासोबत वापरावयाचा सापळा : फ्रुट फ्लाय ट्रॅप

सापळ्यांची संख्या (प्रती एकर): ८-१०

कामगंध बदलण्याचा कालावधी : ६० दिवस

Back to Top