बायो फेरो CI Chilo infescatellus (उसावरील खोड कीड)

घटक:

Chilo infescatellus कामगंध

ओळख व जीवनचक्र

अंडी : मादी पतंग हिरवीगार व टोकाकडे वाकलेल्या पानांवर अंडी देतात. या किडीची अंडी उसाच्या जमिनीलगतच्या तीन हिरव्या पानावरील मध्यशिरेजवळ आढळतात. नुकतीच दिलेली अंडी ही शुभ्र पांढरी असतात. साधारणपणे मादी पतंग पहिल्या सत्रात ४०० अंडी काही पुंजक्‍यांच्या स्वरूपात देतात. नंतर दुसऱ्या रात्री १२५ अंडी दोन-पाच पुंजक्‍यात देतात. या किडीची अंडी अवस्था तीन-सहा दिवस राहते.

अळी : अंड्यातून बाहेर पडलेल्या अळीच्या अंगावर पाच नारंगी रंगाचे पट्टे असतात व ती अळी रात्रीच्या वेळी उसाच्या कोवळ्या पानांवर उपजीविका करते. परिणामी उसात पोंगामर आढळते. पूर्ण वाढ झालेली अळी कोषावस्थेत जाण्याअगोदर खोडाच्या आतून जमिनीच्या वरच्या भागावर चार ते दहा सें.मी. अंतरावर पतंगास बाहेर पडण्यासाठी छिद्रे तयार करून ठेवते व नंतर चंदेरी आवरणात पोंग्याच्या आत कोषावस्थेत जाते. अळी अवस्था २२ – ३१ दिवस राहते.

कोष : कोष खोडामध्ये (पोंग्यात) तयार होतात. कोष लांब, पिवळ्या ते तपकिरी रंगाचा दिसतो.ही अवस्था पाच-नऊ दिवस राहते.

पतंग : या किडीचा पतंग शक्‍यतो सूर्योदयापूर्वी बाहेर पडतात. प्रौढ अवस्था पाच-नऊ दिवस जगते.

नुकसानीचा प्रकार

खोड किडीचा प्रादुर्भाव ऊस लागणीपासून ते मोठ्या बांधणीपर्यंत आढळून येतो. अंड्यातून नुकतीच बाहेर आलेली अळी रांगत अथवा चंदेरी धाग्याला लटकत उसाच्या खोडाजवळ येते. अळी खोडावरील मऊ पेशींवर उपजीविका करते. त्यानंतर अळी खोडाच्या आत शिरून उगवणाऱ्या कोंबाला आठ दिवसात खाऊन टाकते. त्यामुळे १२ ते १८ दिवसांत आपणास पोंगामर दिसते. सदरील पोंगा ओढल्यास सहज उपटून येता, त्याचा उग्र वास येतो.

पिक : ऊस

कामगंधासोबत वापरावयाचा सापळा :डेल्टा ट्रॅप / वॉटर ट्रॅप

सापळ्यांची संख्या (प्रती एकर) : १० – १२

कामगंध बदलण्याचा कालावधी : ६० दिवस

Back to Top