बायो फेरो CSChilo sacchariphagus indicus (उसावरील कांडी अळी)

घटक:

Chilo sacchariphagus indicus कामगंध

ओळख व जीवनचक्र:

अंडी : या किडीची अंडी पानाच्या दोन्ही बाजूस मध्यशिरेलगत आढळतात. नुकतीच दिलेली अंडी ही चपट, अंडाकृती, चमकदार व पांढरी मेणचट असतात. एक मादी पतंग जास्तीत जास्त ४१४ अंडी देते. या किडीची अंडी अवस्था ४ ते ५ दिवस रहते.

अळी: नवीन अळी सुरवातीस पानांवर साधारणत: एक तास फिरते. त्या वेळेस ती वाऱ्यामार्फत आजूबाजूच्या उसावर जाते. ज्या अळी खाली पडतात, त्या नष्ट होतात. ही कीड निशाचर असल्यामुळे व प्रकाशमान जास्त न मानवल्यामुळे उसाच्या पोंग्यात अथवा पानांच्या बेचक्‍यात निवाऱ्यासाठी जाते. पहिल्या व दुसऱ्या अवस्थेची अळी पानांच्या पेशीवर जमतात. तिसऱ्या अवस्थेपासून ही अळी उसाच्या काडीला छिद्रे करते. अंड्यातून नुकतीच बाहेर पडलेली अळी पोंग्याच्या पानांच्या पेशी खरडून काढते. त्यामुळे पाने उघडी झाल्यावर पांढरे पट्टे दिसून येतात. नंतर अळी उसाच्या वरील कोवळ्या कांड्यांना नुकसान करते. कमी वयाच्या उसात विशेषत: खोडवा पिकात कांडीकिडीमुळे नुकसान जास्त स्वरूपात होते. अशावेळेस पोंगामर सुद्धा आढळून येते. हा पोंगा सहजासहजी ओढून काढता येत नाही व याचा उग्र, सडल्यासारखा वासदेखील येत नाही. अळी ही शक्‍यतो खालून वरच्या दिशेला कांडीतून गोलाकार शिडीसारखी खात जाते व तिची विष्ठा छिद्राबाहेर टाकत जाते. ही अळी साधारणत: १ - ४ कांड्या पोखरते. क्वचितप्रसंगी नऊ कांड्यासुद्धा पोखरते. प्रादुर्भाव झालेल्या कांडीला खालच्या बाजूस डोळा फुटतो. उसाच्या कांड्यांना नुकसान झाल्यास उसाच्या रसाची प्रतवारी खराब होते.

कोष: कोषात जाण्याअगोदर अळी बाहेर येते व अर्ध वाळलेले पानाखाली बेचक्यात चंदेरी आवरणात कोषामध्ये जाते. ही अवस्था ५ – १२ दिवस राहते.

पतंग: पतंग सकाळी लवकर कोषातून बाहेर पडतात. मादी पतंग दोन-तीन समांतर ओळीत, हिरव्या पानांच्या दोन्ही व मध्यशिरेला समांतर अशी पुंजक्‍यात अंडी घालतात.

नुकसानीचा प्रकार

कांडी कीड ही उसाच्या कांडीला अनेक छिद्रे करते. नुकत्याच झालेल्या छिद्राच्या बाहेर ओली विष्ठा असते. कांडी किडीमुळे उसाच्या कांड्या आखूड व बारीक होतात.किडीचा प्रादुर्भाव मे ते सप्टेंबर महिन्यांत मोठ्या प्रमाणात आढळतो. या किडीचा प्रादुर्भाव कांडी तयार झाल्यापासून ऊस तोडणीपर्यंत आढळतो. या किडीची अळी उसाच्या एक ते तीन कांड्यांचे नुकसान करते. उसाच्या सुरवातीच्या काळात या किडीची नुकसानीची तीव्रता कमी असते. मात्र नंतर ती वाढत जाते. कांडी किडीमुळे उसाची वाढ कमी होते. कांड्या लहान राहतात व उसास पांगशा फुटतात.

पिक : ऊस

कामगंधासोबत वापरावयाचा सापळा :डेल्टा ट्रॅप / वॉटर ट्रॅप

सापळ्यांची संख्या (प्रती एकर): १० – १२

कामगंध बदलण्याचा कालावधी : ६० दिवस

Back to Top