बायो फेरो EV Earias vitella (ठिपकेदार बोंडअळी)

घटक:

Earias vitella कामगंध

ओळख व जीवनचक्र:

ठिपक्‍यांच्या बोंडअळीचा प्रादुर्भाव कापसाचे पीक साधारणपणे एक महिन्याचे असल्यापासून शेंडेअळी म्हणून सुरू होतो आणि त्यानंतर पाते लागल्यापासून ते शेवटपर्यंत कमी-अधिक प्रमाणात आढळून असते. या किडीच्या दोन प्रजाती पाहावयास मिळतात. इरियास व्हीटेला आणि इरियास इन्सुलेना. या किडीची मादी कापसाच्या झाडाचे शेंडे, पाने, कळ्या, बोंडे इत्यादीवर एकटी अंडी घालते. अंडी मुकुटासारखी गोलाकार व निळसर हिरव्या रंगाची असतात. एक मादी साधारणतः २०० ते ४०० अंडी घालते. चार ते सात दिवसांत अंडी फुटतात आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या १२ ते १८ दिवसांत चार अवस्था पूर्ण करून कोषावस्थेत जातात. पूर्ण वाढ झालेली अळी १८ ते २० मि.मी. लांब व गर्द तपकिरी रंगाची असते. अळीच्या अंगावर काळे, बदामी ठिपके व बारीक काटे असतात. शरीरावर वरच्या बाजूला मधोमध पांढुरका पट्टा असतो. अळी रेशमी तंतूच्या आवरणाखाली कोष करून खाली पडलेल्या पान, फुले, बोंड यामध्ये कोषावस्थेत जाते. कोषाचा रंग तपकिरी व कालावधी आठ ते १२ दिवस असतो. कोषातून निघालेले पतंग आठ ते २२ दिवस जगतात. या किडीचा जीवनक्रम २२ ते ३५ दिवसांत पूर्ण होतो आणि एका वर्षात सहा ते आठ पिढ्या तयार होतात.

नुकसानीचा प्रकार:

कपाशीचे पीक साधारणत: एक महिन्याचे झाल्यानंतर या किडीचा उपद्रव सुरू होतो. अळी प्रथम झाडाच्या शेंड्यात शिरून आतील भाग खाते. त्यामुळे असे शेंडे सुकून जातात. अशा वेळी सुकलेल्या शेंड्याच्या बाजूने नवीन शेंडे/ फांद्या येतात. नंतर पाने, फुले, बोंडे लागल्यावर ही कीड तिच्यावर आक्रमण करते. किडीने पोखरलेली बोंडे तिच्या विष्ठेने भरलेली दिसतात. कीड लागलेल्या कळ्या, बोंडे इत्यादी झाडाखाली गळून पडलेली दिसतात. झाडावर शिल्लक राहिलेली किडकी बोंडे लवकर फुटतात आणि त्यापासून हलक्‍या प्रतीचा कापूस मिळतो.

पिके: कापूस, भेंडी

कामगंधासोबत वापरावयाचा सापळा: फनेल ट्रॅप

सापळ्यांची संख्या(प्रती एकर): ७ – ८

कामगंध बदलण्याचा कालावधी: ६० दिवस

Back to Top