बायो फेरो HA Helicoverpa armigera (हिरवी बोंडअळी / घाटे अळी)

घटक :

Helicoverpa armigera कामगंध

ओळख व जीवनचक्र :

अळीचा पतंग मजबूत बांध्याचा, फिकट पिवळा किंवा बदामी रंगाचा असतो. मादी पतंग कोवळ्या पानांवर अंडी घालते. एक मादी सुमारे ३००-६०० अंडी घालते. अंडी घुमटाच्या आकाराची पिवळसर पांढऱ्या रंगाची असतात. तीन ते चार दिवसांनी अळी बाहेर पडते. पहिल्यांदा ती अंड्याचे कवच खाते मगच पाने खाते. पहिल्या अवस्थेतील अळी फिकट हिरवी असते व मोठी अळी हिरवट, फिकट पिवळसर, तपकिरी किंवा काळी असते. अळीच्या शरीरावर दोन्ही कडांना तुटक गर्द करड्या रेषा असतात. अळी सुरवातीला पाने खाते. त्यानंतर कळ्या, फुले व शेंगांना नुकसान पोचविते. मोठ्या शेंगांना अळी गोल छिद्रे पाडून आतील दाणे खाते. अळीची २० ते २४ दिवसांत पूर्ण वाढ होऊन जमिनीमध्ये कोषावस्थेत जाते. कोष तपकिरी रंगाचे असतात. ९ ते १३ दिवसांनी कोषातून पतंग बाहेर पडतो. एक जीवनक्रम ३१ ते ३५ दिवसांमध्ये पूर्ण होतो.

नुकसानीचा प्रकार :

अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्या सुरवातीस कोवळी पाने, कळ्या, फुले यावर उपजीविका करतात. बोंडे लागल्यानंतर यामध्ये तोंड खुपसून आतील भाग खातात. अशी लहान बोंडे, पात्या, फुले, कळ्या गळून पडतात किंवा झाडावरच पावसाच्या पाण्यामुळे सडतात. या अळीने तयार केलेले छिद्र इतर अळ्यांनी तयार केलेल्या छिद्रापेक्षा मोठे असते. बोंडे खाताना अळीचा समोरचा अर्धा भाग बोंडात आणि पाठीमागचा अर्धा भाग बाहेर असतो. शिवाय बोंडाबाहेर विष्ठा पडलेली आढळते. एक अळी दर दिवशी ८ ते १५ पोत्या व कळ्याचे नुकसान करू शकते. त्यामुळे कापसाचा दर्जा ढासळतो व उत्पादनात मोठी घट होते.

पिके : टोमॅटो, वाटाणा, हरभरा, तूर, मका, ज्वारी, सूर्यफूल, सोयाबीन, अनेक तणे इत्यादी.

आर्थिक नुकसान पातळी :

कामगंधासोबत वापरावयाचा सापळा : फनेल ट्रॅप

सापळ्यांची संख्या (प्रती एकर) : ७ – ८

कामगंध बदलण्याचा कालावधी : ६० दिवस

Back to Top