बायो फेरो OR Oryctes rhinoceros (गेंड्या भुंगा)

घटक:

Oryctes rhinoceros कामगंध

ओळख व जीवनचक्र :

गेंड्या भुंगा मध्यम आकाराचा असून, रंगाने गडद तपकिरी किंवा काळा असतो. त्याच्या डोक्‍यावर पाठीमागच्या बाजूस गेंड्यासारखे एक शिंग असल्यानेच या किडीला "गेंड्या भुंगा' असे म्हटले जाते. प्रौढ भुंगा नारळाच्या झाडाचे नुकसान करतो. गेंड्या भुंग्याच्या अंडी, अळी व कोष या तीनही अवस्था शेणखत तसेच कुजलेल्या पालापाचोळ्यामध्ये आढळतात. अंडी रंगाने पांढरी असून, त्यांचा आकार साबुदाण्याएवढा असतो. पूर्ण वाढलेली अळी फिक्कट पांढऱ्या रंगाची असून, तिचे डोके रंगाने तपकिरी असते. कोष गर्द तपकिरी रंगाचे असतात. प्रौढ मादी सडणारा पालापाचोळा, शेणखताचे खड्डे किंवा मेलेल्या माडाच्या कुजणाऱ्या भागामध्ये सुमारे ७० ते १०० अंडी घालते. ही अंडी ८ ते १४ दिवसांत उबून बाहेर पडलेल्या अळ्या कुजलेल्या शेणखतावर उपजीविका करतात. अळ्यांची वाढ सुमारे तीन ते सहा महिन्यांत पूर्ण होते. पूर्ण वाढलेल्या अळ्या खड्ड्यातच मातीचे आवरण तयार करून कोषावस्थेत जातात. कोषावस्था सुमारे २० ते ६० दिवस असते. त्यानंतर प्रौढ भुंगा बाहेर पडून तो झाडाचे नुकसान करतो. भुंगा दोन ते चार महिने जगतो. या किडीची वर्षातून एकच पिढी तयार होते. भुंगा नारळाच्या शेंड्यामध्ये नवीन येणारा कोंब किंवा सुई पोखरून खातो. लहान रोपांमध्ये सुईचे उगमस्थान भुंग्याने खाऊन फस्त केल्यास अशा रोपांना नवीन सुई येत नाही. कालांतराने रोप मृत पावते.

नुकसानीचा प्रकार

काही वेळेस न उमललेली पोयदेखील भुंगा कुरतडून खातो. अशी पोय न उमलता वाळते. त्यामुळे याचा परिणाम नारळाची वाढ आणि उत्पादनावर होतो. नवीन सुई कुरतडली गेल्यामुळे लागण झालेल्या झाडाच्या झावळ्या त्रिकोणी आकारात कात्रीने कापल्यासारख्या दिसतात. या प्रमुख लक्षणावरून या किडीचा प्रादुर्भाव सहज ओळखता येतो. लहान झाडांबरोबर मोठ्या झाडांवर या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. जुलै ते सप्टेंबर या महिन्यांत या भुंग्याची तीव्रता जास्त आढळते.

पिक: नारळ

कामगंधासोबत वायरावयाचा सापळा: बकेट ट्रॅप

सापळ्यांची संख्या (प्रती एकर): १ – २

कामगंध बदलण्याचा कालावधी: १२० दिवस

Back to Top