बायो फेरो PX Plutella xylostella (चौकोनी ठिपक्याचा पतंग)

घटक:

Plutella xylostella कामगंध

ओळख व जीवनचक्र :

भुरकट रंगाच्या या पाकोळीच्या पाठीवर चौकटीच्या आकाराचा पांढरा ठिपका असतो. म्हणून या किडीला चौकोनी ठिपक्याचा पतंग हे नाव पडले आहे. या किडीच्या एका हंगामात ५ ते ७ पिढ्या पुर्ण होतात. हलक्या पिवळ्या रंगाची अंडी पानांच्या खालील बाजुस एकट्याने (एका ठिकाणी एक) दिली जातात. अंड्यातुन ७ दिवसांत पिल्ले बाहेर येतात. सुप्तावस्था रेशमासारख्या कोषात पानांवर पुर्ण केली जाते.

नुकसानीचा प्रकार :

या किडीचा पतंग पानकोबी तसेच सर्व कोबीवर्गीय भाज्यांच्या पानांवर पिवळसर राखी रंगाची अंडी घालतो. त्यातून फिकट हिरव्या किंवा भुरकट रंगाच्या अळ्या बाहेर पडतात.या अळ्या पानाच्या खालच्या बाजूस राहून पानाचा पृष्ठभाग खरडून खातात. त्यामुळे पानावर असंख्य छिद्रे पडून पान चाळणीसारखे दिसते. किडीचे प्रमाण वाढल्यास पानाची चाळणी होऊन पानाच्या शिराचा शिल्लक राहतात. सप्टेंबर ते मार्च या काळात कोबीवर्गीय पिकांवर महाराष्ट्रात ही कीड सर्वत्र आढळते.अळी पानांच्या खालील बाजुस राहुन पानांवर छिद्र पाडते. किड सप्टेंबर ते मार्च महिन्यापर्यंत सक्रिय राहते.

पिके : ब्रोकोली, नवल कोंब, कोबी, फ़ुलकोबी, मोहरी, मुळा, सलगम नवल गोल.

कामगंधासोबत वापरावयाचा सापळा :फनेल ट्रॅप / डेल्टा ट्रॅप / वॉटर ट्रॅप

सापळ्यांची संख्या (प्रती एकर) : १० – १२

कामगंध बदलण्याचा कालावधी : ६० दिवस

Back to Top