बायो फेरो RF Rhynchophorus ferrugineus (सोंड्या भुंगा)

घटक:

Rhynchophorus ferrugineus कामगंध

ओळख:

या किडीचा प्रौढ गर्दलाल किंवा तपकिरी रंगाचा असून पाठीवर सहा गर्द ठिपके आढळतात. याची लांबी साधारण ३५ मि. मी. असते. या किडीच्या प्रौढामध्ये नर प्रौढाला सोंडेसारखा आकार तयार झालेला असतो म्हणून या किडीस सोंड्या भुंगा म्हणतात.

नुकसानीचा प्रकार :

हा भुंगा लाल रंगाचा असून, त्याला तोंडाकडच्या भागावर सोंड असते. किडीची मादी माडाच्या खोडाकडील भोकात किंवा शेंड्याजवळील भागात अंडी घालते. अळ्या झाडाच्या खोडातील, तसेच कोंबातील मऊ भाग कुरतडून खातात. खोड आतून पोखरत असल्यामुळे प्रादुर्भाव झाल्याचे चटकन लक्षात येत नाही. प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या खोडावर प्रथम तांबूस-तपकिरी रंगाचा स्राव बाहेर येतो. त्यापुढची अवस्था म्हणजे खोडाला छोटी-छोटी भोके पडलेली दिसतात, त्यातून भुसा बाहेर येताना दिसतो. बाहेरील आवरण तसेच राहून खोडाच्या आतील भाग खाल्ल्याने असा नारळ पोकळ होतो आणि कधी कधी वाऱ्याने कोलमडून पडतो. झाडाच्या कोंबाकडील भागात प्रादुर्भाव झाला असता सर्वप्रथम पाने निस्तेज दिसतात, नंतर पिवळी होतात. कालांतराने कोंब खाल्ल्याने शेंडा मरतो. या किडीचा प्रादुर्भाव दुर्लक्षित बागांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. एखाद्या बागेत एखाद्या झाडाला उपद्रव झाला आणि त्याचे नियंत्रण केले नाही तर त्या बागेत या किडीचा उपद्रव लगेचच पसरतो.

पिक: नारळ

कामगंधासोबत वापरावयाचा सापळा: बकेट ट्रॅप

सापळ्यांची संख्या (प्रती एकर): १ – २

कामगंध बदलण्याचा कालावधी: १८० दिवस

Back to Top