बायो फेरो SI Scirpophaga incertulas (भातावरील पिवळा खोडकीडा)

घटक:

Scirpophaga incertulas कामगंध

ओळख:

या किडीच्या पूर्ण वाढ झालेल्या अळीचा रंग पिवळा असतो. पतंग पिवळसर असून मादी नरापेक्षा आकाराने मोठी असते. मादीच्या पुढील पंखांच्या जोडीवर मध्यभागी एक – एक काळा ठिपका असतो. या पतंगाची लांबी १.३ सें. मी. असते तसेच त्याचे पंख ३.२ सें. मी. रुंद एवढे पसरलेले असतात.

जीवनचक्र:

अळीच्या पूर्ण वाढीसाठी २० – ४० दिवसांचा कालावधी लागतो. तिची लांबी २० मि. मी. असते आणि रंग पांढरा ते पिवळा असतो.एका पिकाच्या कालावधीमध्ये या किडी त्यांच्या २ ते ३ पिढ्या पूर्ण करतात. खोडकिडा हा त्याचे जिवनचक्र ४० ते ४५ दिवसात पूर्ण करतो.

नुकसानीचा प्रकार :

अळी प्रथम पानाच्या कोवळ्या भागावर उपजिवीका करते आणि नंतर खोडामध्ये शिरून आतील भाग खाण्यास सुरुवात करते. किडीचा प्रादुर्भाव जर पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजेच पीक पोटरीवर येण्यापूर्वी झाला तर मधला गाभा वरून खाली सुकत येतो, याला 'गाभा जळणे' असे म्हणतात. कीड जर पीक पोटरीवर आल्यानंतर पडली तर दाणे न भरलेल्या पांढऱ्या ओंब्या बाहेर पडतात, त्याला 'पळीज' म्हणतात.

पिक: भात

कामगंधासोबत वापरवयाचा सापळा: फनेल ट्रॅप

सापळ्यांची संख्या (प्रती एकर): १०-१२

कामगंध बदलण्याचा कालावधी: ६० दिवस

Back to Top