बायो फेरो SLSpodoptera litura (पाने खाणारी अळी)

घटक:

Spodoptera litura कामगंध

ओळख व जीवनक्रम :

अंडी: मादी पतंग रात्रीच्या वेळी पानाच्या खालच्या बाजूस शिरेजवळ पुंजक्‍याने अंडी घालते. एक मादी पतंग जवळपास २१०० अंडी तीन ते चार पुंजक्‍यांत घालते. एका पुंजक्‍यात सुमारे ३०० ते ६०० अंडी असतात. अंड्यातून दोन ते तीन दिवसांनी अळ्या बाहेर पडतात.

अळी: लहान अळ्या सुरवातीस समूहाने राहतात, पानाच्या खालचा भाग खरवडून खातात. या अळ्या हिरव्या असून त्यांचे डोके काळे असते. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर अळ्या तीन ते पाच दिवस समूहाने राहतात. मोठ्या झाल्यानंतर (साधारणपणे तिसऱ्या व त्यापुढील अवस्था) विखरून एक-एकट्या पाने खातात. पूर्ण वाढलेली अळी गडद तपकिरी किंवा हिरवट पांढऱ्या रंगाची असून, तिच्या शरीरावर फिकट पाच रेषा असतात. एका वर्षामध्ये या किडीच्या सहा ते आठ पिढ्या तयार होतात.

कोष: अळी पाच वेळा कात टाकून २० ते २२ दिवसांनी जमिनीमध्ये कोषावस्थेत जाते. कोष लालसर तपकिरी असतात. कोषावस्था आठ ते दहा दिवसांची असते. नंतर कोषामधून पतंग बाहेर पडतात.

पतंग: स्पोडोप्टेराचे पतंग मजबूत बांध्याचे आणि मध्यम आकाराचे असून, त्यांचे पुढील पंख फिक्कट करडे ते गर्द तांबूस रंगाचे असतात. त्यावर ठिपके असतात. कोवळ्या पानांखाली मुख्य शिरेजवळ पतंग गोलाकार पुंजक्याने १०० ते ४०० अंडी घालून ती भुरकट केसांनी आच्छादून घेतात. अंडी ३ ते ८ दिवसांत उबतात. अळी अवस्था २० ते ३० दिवसांची असते. ५ वेळा कात टाकून पूर्ण वाढल्यानंतरच अळ्या जमिनीवर पडलेल्या पालापाचोळयात किंवा मातीमध्ये कोषावस्थेत जातात. ७ ते १५ दिवसांनी त्यातून पतंग बाहेर पडतात. अशाप्रकारे या किडींचा जीवनक्रम ५० ते ६० दिवसांत पूर्ण होतो.

नुकसानीचा प्रकार :

अळ्या लहान असताना एकत्रितपणे पानांच्या खालच्या बाजूने हरितद्रव्य खातात. त्यामुळे पानांच्या शिरा तेवढ्या दिसतात. मोठ्या झाल्यावर अळ्या वेगवेगळ्या होतात आणि पानांना लहान - मोठ्या आकाराची छिद्रे पाडतात. तसेच सोयाबीनच्या कळ्या, फुले, कोवळ्या शेंगा, शेंड्यांचा फडशा पाडून पिकाचे अतिशय नुकसान करतात. ही कीड अत्यंत खादाड आहे. त्यामुळे किडींच्या संख्येत झालेली थोडीशी वाढही प्रचंड नुकसानीला कारणीभूत बनते. मोठ्या अळ्या पानावर मोठे छिद्र पाडून खातात. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असेल तर झाडाची पूर्ण पाने खाऊन फक्त शिराच शिल्लक राहिलेल्या दिसतात. फुले व शेंगा लागल्यानंतर या अळ्या शिरा देखील खातात.

पिके: कापूस, सोयाबीन, भेंडी, झेंडू, डाळींब, पेरु, वांगी, एरंडी, बटाटा, भुईमुग, गुलाब, द्राक्ष, कोबी, फ्लॉवर, मिरची, तंबाखू, सुर्यफुल, लसून घास.

कामगंधासोबत वापरावयाचा सापळा: फनेल ट्रॅप

सापळ्यांची संख्या(प्रती एकर):७ – ८

कामगंध बदलण्याचा कालावधी: ६० दिवस

Back to Top