बायो रुट प्लस

Contents

Humic Acid – 75 %
Fulvic Acid – 15 %
Fillers and Carriers – 10 %

बायो रुट प्लस मुळे तसेच पानांची वाढ घडवून आणणारे एक नैसर्गीक उत्पादन असून याच्या वापराने पिकांच्या एकूण वाढीसाठी लागणारे घटक योग्य प्रमाणात उपलब्ध होतात. मुळे, पाने, फुले तसेच फळांची भरघोस वाढ होऊन फळे, भाजीपाला, फुले तसेच अन्नधान्य यांचा दर्जा व उत्पादनात वाढ होते.

बायो रूट प्लसचे फायदे

  • बायो रूट प्लस जमीनीची जडनघडन सुधारून पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते त्याचबरोबर वापरलेली खते मुळांच्या सान्नीध्यात धरून ठेवली जात असल्याने त्यांची कार्यक्षमता वाढते तसेच जमीनीची धूप कमी होऊन अन्नद्रव्यांचा पाण्यासोबत वाहून होणारा र्‍हास कमी करते.
  • बायो रूट प्लस पांढर्‍या मुळांच्या वाढीस चालना देते तसेच बियाण्यांची उगवणक्षमता वाढवते.
  • बायो रूट प्लस जमिनीतील तसेच खतांमधील अन्नद्रव्ये नियमीतपणे पिकांच्या मुळांना उपलब्ध करून देते.
  • बायो रूट प्लस नैसर्गीक चिलेटींग एजंट असल्याने अन्नद्रव्यांना धरून ठेवते व पिकांच्या मुळांना शोषणयोग्य स्वरुपात वेळोवेळी उपलब्ध करुन देत असल्याने अन्नद्रव्यांचे शोषण वाढते.
  • बायो रूट प्लस मुळे पिकांची प्राणवायू शोषणक्षमता तसेच पानांमधील हरितद्रव्य यामध्ये वाढ होते, त्याचबरोबर मुळांद्वारे अन्नद्रव्य शोषणक्षमता वाढते.
  • बायो रूट प्लस मुळे जमिनीतील विविध प्रकारच्या फयदेकारक सुक्ष्म जिवाणूंच्या वाढीला प्रोत्साहन मिळून त्यांची कार्यक्षमता वाढते.
  • बायो रूट प्लस च्या वापराने पिके किड, रोग, प्रतिकूल वातवरण, पाण्याची कमतरता यासारख्या ताणांना चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकतात.
  • जमिनीतील हानीकारक रसायने तसेच तणनाशके यांचा पिकवाढीवर होणारा प्रतिकूल परिणाम बायो रूट प्लसच्या वापराने कमी करता येतो.
  • जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये विरघळवण्याची खास क्षमता बायो फ्रेश मध्ये असल्याने पिकांना आवश्यक अन्नद्रव्ये शोषणासाठी वेगाने उपलब्ध होतात.
  • बायो रूट प्लस च्या वापराने पिकांची पर्णरंध्रे उघडण्याची क्रिया वाढते. त्यामुळे पिकांच्या श्वसनक्रियेत वाढ होते. त्याचा चांगला परिणाम पिकांच्या वाढीवर होतो.

वापरण्याचे प्रमाण

जमिनीतून

प्रती एकर १ ते २ किलो बायो रूट प्लस सेंद्रिय किंवा रासायनीक खतांमध्ये मिसळून द्यावे.

ठिबक सिंचनामधून

प्रती एकर १ ते २ किलो बायो रूट प्लस पाण्यामध्ये विरघळवून ठिबक सिंचनाद्वारे मुळांशी द्यावे.

आळवणीसाठी

५-१० ग्रॅम बायो रूट प्लस प्रती लिटर पाण्यात मिसळून मुळांजवळ आळवणी करावी.

रोपे पुनर्लागवड

पुनर्लागवडीपुर्वी ५ ग्रॅम बायो रूट प्लस प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून रोपांची मुळे ५-१० मिनीटे बुडवून नंतर लागवड करावी.

बिज / बेणे प्रक्रिया

५ ग्रॅम बायो रूट प्लस प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून बियाणे / बेणे / कंद १५ मिनीटे बुडवून ठेवावीत. त्यानंतर बियाणे सावलीमध्ये सुकवून लागवड करावी.

उपलब्धता

१००० ग्रॅम

Back to Top