बायो रुट

Contents

Humic Acid – 55 %
Fillers and Carriers – 45 %

बायो रुट सेंद्रिय तसेच रासायनिक खतांची कार्यक्षमता प्रभावीपणे वाढवीणारे एक नैसर्गीक उत्पादन आहे. याच्या वापराने जमिनीची घडण सुधारून पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. त्याचबरोबर बायो रूट पिकांना पाण्याचा ताण सहन करण्याची शक्ती देते. यामुळे जमिनीतील अन्नद्रव्ये पाण्यात विरघळून पिकांना नियमितपणे उपलब्ध होतात तसेच जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते. बायो रूट मुळे पिकांच्या मुळांची भरघोस वाढ होत असल्याने अन्नद्रव्यांचे शोषण वाढून दर्जा व उत्पादनात वाढ होते.

बायो रूट चे फायदे

  • बायो रूट मुळे जमीनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते तसेच मातीची धूप कमी होण्यास मदत होते.
  • बायो रूट पांढर्‍या मुळांच्या वाढीस चालना देते.
  • बायो रूट जमिनीत वापरल्या जाणार्‍या खतांची कार्यक्षमता वाढवते तसेच अन्नद्रव्यांचा पाण्यासोबत वाहून होणारा र्‍हास कमी करते.
  • बायो रूट जमिनीतील तसेच खतांमधील अन्नद्रव्ये नियमीतपणे पिकांच्या मुळांना उपलब्ध करून देते.
  • बायोरुट मुळे पिकांची मुळांद्वारे अन्नद्रव्य शोषण क्षमता वाढते तसेच ही अन्नद्रव्ये मुळांच्या सान्नीध्यात धरून ठेवली जातात.
  • बायो रूट च्या वापराने जमिनीमध्ये पिकवाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्याने अन्नद्रव्य शोषण वाढून पिकांची चांगली वाढ होते.
  • बायो रूट पिकांना जमिनीच्या प्रतिकूल सामूशी अनुरूप होण्याची शक्ती देते.
  • बायो रूट च्या वापराने पिके किड, रोग, प्रतिकूल वातवरण, पाण्याची कमतरता यासारख्या ताणांना चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकतात.
  • जमिनीतील हानीकारक रसायने तसेच तणनाशके यांचा पिकवाढीवर होणारा प्रतिकूल परिणाम बायो रूटच्या वापराने कमी करता येतो.
  • पिकांना आवश्यक असणार्‍या सुक्ष्म जिवाणूंच्या वाढीला बायो रूट च्या वापराने प्रोत्साहन मिळते.

वापरण्याचे प्रमाण

जमिनीतून

प्रती एकर १ ते २ किलो बायो रूट सेंद्रिय किंवा रासायनीक खतांमध्ये मिसळून द्यावे.

ठिबक सिंचनामधून

प्रती एकर १ ते २ किलो बायो रूट पाण्यामध्ये विरघळवून ठिबक सिंचनाद्वारे मुळांशी द्यावे.

आळवणीसाठी

५-१० ग्रॅम बायो रूट प्रती लिटर पाण्यात मिसळून मुळांजवळ आळवणी करावी.

रोपे पुनर्लागवड

पुनर्लागवडीपुर्वी ५ ग्रॅम बायो रूट प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून रोपांची मुळे ५-१० मिनीटे बुडवून नंतर लागवड करावी.

बिज / बेणे प्रक्रिया

५ ग्रॅम बायो रूट प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून बियाणे / बेणे / कंद १५ मिनीटे बुडवून ठेवावीत. त्यानंतर बियाणे सावलीमध्ये सुकवून लागवड करावी.

उपलब्धता

१००० ग्रॅम

Back to Top