बोन मील / बोन ग्रीस्ट

कत्तलखान्यातील टाकावू पदार्थ व पशूंच्या हाडांचा चुरा पिकांसाठी सेंद्रीय खत म्हणून उपयोगी ठरतो. यामध्ये प्रामुख्याने स्फुरद हा घटक असून तो पिकांना थोडया थोडया प्रमाणात दिर्घकाळापर्यंत उपलब्ध होत राहतो. त्याच बरोबर बोन मील मध्ये पिकांच्या वाढीसाठी आवश्यक अशी प्रथीने,कॅलशीयम व इतर पोषक अन्नद्रव्ये असतात.

बोनमील चा वापर प्रामुख्याने मुळांच्या वाढीसाठी व लागवड केलेल्या रोपांना लवकर जोम फुटण्यासाठी केला जातो. परिणामी झाडांची भरघोस वाढ होऊन फुले व फुलधारणेचे प्रमाण वाढते.

जमीनीमधील उपयुक्त सुक्ष्म जीवाणूच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार करण्याचे काम बोनमील मुळे होते. त्याच बरोबर जमीनीची जडणघडण सुधारुण पिक वाढिस प्रोत्साहन मिळते.

बोनमील / ग्रीस्ट मधील घटक

घटक प्रमाण
नत्र २.९५ %
स्फुरद (P2O5) १९.९५ %
पालाश (K2O) २२.१५ %

फायदे

  • पिकांना आवश्यक असणा-या नत्र, स्फुरद व पालाश या मुख्य अन्न घटकांनी समृध्द.
  • लागवडीच्या वेळी वापरल्यास रोपांच्या वेगवान वाढीसाठी प्रोत्साहन मिळते.
  • वापरानंतर जवळ जवळ ४ महिन्यांपर्यत थोड्या थोड्या प्रमाणात स्फुरद उपलब्ध होत असल्याने दिर्घकाळापर्यंत परिणाम मिळतो.
  • जमीनीतील सुक्ष्म जीवाणूंची वाढ करुन जमीनीचे जैविक गुणधर्म सुधारतात.
  • पिकांचा रंग, चव, दर्जा, साठवणक्षमता तसेच उत्पादनामध्ये वाढ करण्याची उपयुक्त.
Back to Top