कोको पीट वीट

रोपवाटीका आणि हरितगृहामध्ये झाडांच्या वाढीसाठी माध्यम तयार करताना इतर घटकांसोबत कोकोपीट चा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागतो. वनस्पतीवाढीसाठी माध्यम म्हणून ब-याच प्रकारचे घटक वापरले जातात. शास्त्रीयदॄष्ट्या या घटकांपैकी नारळ प्रक्रीया उद्योगामधील घटक सर्वोत्तम मानले जातात. जमिनीच्या भौतिक, रासायनिक व तसेच जैविक गुणधर्मांच्या सुधारणांसाठी कोकोपीट हा एक फायदेशीर पर्याय आहे.

कोको पीट चे फायदे

  • पिकांना आवश्यक मुख्य अन्नद्रव्ये हळूहळू व दिर्घकाळापर्यंत उपलब्ध करत राहण्याची क्षमता प्रदान करते.
  • जमिनीची भौतिक तसेच रासायनिक जडणघडण सुधारुन अन्नद्रव्यांचे शोषण वाढवते.
  • संपूर्णत: नैसर्गिक घटकांपासून बनलेले असल्याने पर्यावरणपूरक असून सर्व प्रकारच्या जमीनींमध्ये व सर्व प्रकारच्या पिकांसाठी वापरता येते.
  • कोकोपीट हे एक उत्कृष्ट भूसुधारक असून याच्या नियमीत वापराने जमीनींच्या अनेक समस्या सुधारल्या जातात.
  • कोको पीट वीटा प्रक्रीया करुन बनवण्यात आल्या असल्याने कुठल्याही प्रकारचे तणांचे बी अथवा हानीकारक सूक्ष्म जीव यामध्ये नसतात.
  • मातीची सच्छीद्रता वाढल्याने कायम वाफसा स्थिती ठेवण्यास मदत होते.
  • सच्छीद्र्तेबरोबरच पाणी धारण क्षमता संतूलीत झाल्याने अन्नदव्यांचा –हास थांबतो.

गुणधर्म

कोको पीट वीट कमी विद्युतवाहकता (चाळलेली) कोको पीट वीट जास्त विद्युतवाहकता (चाळलेली)
घटक प्रमाण घटक प्रमाण
विद्युतवाहकता ०.५ पेक्षा कमी ते १.२ विद्युतवाहकता १.२ पेक्षा जास्त
सामू ५.५ ते ६.५ सामू ६.५ ते ७
वाळूचे प्रमाण किमान: ३ % कमाल: ५ % वाळूचे प्रमाण किमान: ५ % कमाल: ७ %
धाग्याचे प्रमाण किमान: २ % कमाल: ४ % धाग्याचे प्रमाण किमान: २ % कमाल: ४ %
ओलावा किमान: १५ % कमाल: १८ % ओलावा किमान: १५ % कमाल: १८ %
विटेचा आकार ३०x३०x१२ सेंमी विटेचा आकार ३०x३०x१२ सेंमी
फुगल्यानंतरचे घनफळ १५ लि ते १६लि / किलो फुगल्यानंतरचे घनफळ १५ लि ते १६ लि/ किलो
इतर घटक इतर घटक

 

कोको पीट वीट कमी विद्युतवाहकता (न चाळलेली) कोको पीट वीट जास्त विद्युतवाहकता (न चाळलेली)
घटक प्रमाण घटक प्रमाण
विद्युतवाहकता ०.५ पेक्षा कमी ते १.२ विद्युतवाहकता १.२ पेक्षा जास्त
सामू ५.५ ते ६.५ सामू ६.५ ते ७
वाळूचे प्रमाण किमान: ३ % कमाल: ५ % वाळूचे प्रमाण किमान: ५ % कमाल: ७ %
धाग्याचे प्रमाण किमान: ८ % कमाल: १० % धाग्याचे प्रमाण किमान: ८ % कमाल: १० %
ओलावा किमान: १५ % कमाल: १८ % ओलावा किमान: १५ % कमाल: १८ %
विटेचा आकार ३०x३०x१२ सेंमी विटेचा आकार ३०x३०x१२ सेंमी
फुगल्यानंतरचे घनफळ १२ लि ते १४ लि/ किलो फुगल्यानंतरचे घनफळ १२ लि ते १४ लि/ किलो
इतर घटक ५ % (पाने, बीया) इतर घटक ५ % (पाने, बीया)

* वर दिलेल्या घटकांचे प्रमाण अंदाजीत व सरासरी आहे.

Back to Top