सरकी पेंड

जमीनीचे भौतिक, रासायनिक तथा जैविक गुणधर्म सुधारण्यासाठी सरकी पेंडीच्या वापर केला जातो. अनेक प्रकारच्या पेंढ मिश्रणांमध्ये देखील सरकी पेंड वापरली जाते. पिकांना आवश्यक असणारे मुख्य, दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये नैसर्गीक व सेंद्रीय स्वरुपात उपलब्ध असल्याने सरकी पेंड एक उत्कॄष्ट सेंद्रीय खत म्हणून वापरता येते.

सरकी पेंडी मधील अन्नद्रव्यांचे प्रमाण

घटक प्रमाण
तेल ३.१ – ३.३ %
ओलावा ९ – १० %
प्रथिने १४ - १५ %

फायदे

  • सुक्ष्म जीवाणूंच्या वाढीला प्रोत्साहन देत असल्याने जास्त क्षारता व सामू असलेल्या जमिनीची सुधारणा करते.
  • सर्व प्रकारची अन्नद्रव्ये हळूहळू पिंकाना उपलब्ध होत असल्याने दिर्घकाळापर्यंत परिणाम मिळतात.
  • पाण्यासोबत वाहून जाण्याने होणारा अन्नद्र्व्याचा –हास थांबवते.
  • यातील नैसर्गीक पदार्थ जमीनीची जडणघडण सुधारून जलधारणा शक्ती वाढवतात.
  • जमीनीच्या सेंद्रीय कर्बात वाढ होऊन पिकवाढीस प्रोत्साहन मिळते.
Back to Top