क्रिप्टोलॅमस भुंगेरे    (Cryptolaemus montrozieri)

विविध पिकांवर येणार्‍या पिठया ढेकूण (मिलीबग) या किडीच्या नैसर्गिक नियंत्रणासाठी क्रिप्टोलॅमस (ऑस्ट्रेलियन लेडी बर्ड) भुंगेर्‍यांचा वापर सेंद्रीय शेतीमध्ये तसेच एकात्मीक किड नियंत्रणामध्ये प्रभावीपणे करता येतो. त्यांचा उपयोग द्राक्ष, सिताफळ, लिंबू, डाळींब, आंबा, चिकू, कपाशी, ऊस आदी पिकांत होतो.

या भुंगेर्‍यांची मादी पिठया ढेकणाच्या अंडी पुंजांवर आपली अंडी घालते. या अंडयांमधुन निघणार्‍या अळ्या पिठया ढेकणाच्या अंडी, पिले तसेच प्रौढ अवस्थांवर उपजीविका करतात. भुंगेर्‍याची एक मादी आपल्या २ महीन्याच्या आयुष्यामध्ये ४०० अंडी घालू शकते. त्यामुळे पिठया ढेकूण या किडींची वाढ रोखण्यास प्रभावी ठरते.

वापरण्याची पध्दत

एकरी ५०० – १००० भुंगेरे किंवा अळ्या सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशीरा शेतामध्ये पिकावर सोडावे.

पिठया ढेकणांचा प्रादुर्भाव जास्त असल्यास एकापेक्षा जास्त वेळा अळ्या / भुंगेरे शेतामध्ये सोडावेत.

Back to Top