क्रायसोपर्ला    (Chrysoperla zastrowi sillemi)

पिकांवर येणार्‍या बोंड / घाटेअळी व मावा यासारख्या किडींचे नैसर्गिक नियंत्रण करण्यासाठी क्रायसोपर्लाचा वापर केला जातो. क्रायसोपर्ला किटकाची मादी हानीकारक किडींची वसतीस्थाने शोधुन तेथे अंडी घालते. अंडयांमधुन निघणार्‍या अळ्या किडींना खाऊन आपली उपजीवीका करतात.

अळीची वाढ होत असताना त्यांचे खाण्याचे प्रमाण देखील वाढते. परीणामी अधिकाधीक किडींचा नाश होतो. त्यांचा उपयोग कापूस, मका, सूर्यफूल, भाजीपाला व फळपिकांत होतो.

माव्यासोबतच तुडतुडे, पिठया ढेकूण, पांढरी माशी, फुलकिडे, कोळी, बोंडअळीची अंडी, खवले किडीची पिले तसेच मऊ शरीराच्या किडी, त्यांची अंडी, लहान पिल्ले यांच्यावरही उपजीवीका करत असल्याने क्रायसोपर्लामुळे विविध किडींचे नियंत्रण शक्य होते.

एकात्मीक किड नियंत्रणामध्ये संपूर्णपणे नैसर्गिक रितीने किडींचे व्यवस्थापन होत असल्याने सेंद्रीय शेतीमध्ये क्रायसोपर्लाचा वापर प्रभावीपणे करता येतो.

वापरण्याची पध्दत

एकरी ३००० – ४००० अळ्या / अंडी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशीरा शेतामध्ये पिकावर सोडावे.

Back to Top