SAIPM डेल्टा ट्रॅप

या सापळ्यांचा वापर प्रामुख्याने वांग्यावरील शेंडे आणि फळ पोखरणारी अळी, उसावरील कांडी अळी आणि उसावरील खोडकिडींच्या नियंत्रणासाठी केला जातो.

लक्षणीय कीड : Leucinodes orbonalis (वांग्यावरील शेंडा व फळ पोखरणारी), Chilo sacchariphagus indicus (उसावरील कांडी अळी), Chilo infescstellus (उसावरील खोडकिड), Tuta absoluta (टोमॅटो वरील नागअळी), Maruca vitrata (शेंगवर्गीय पिकांवरील पाने व फुले जाळी करणारी अळी).

पिके: वांगी, उस, टोमॅटो, मिरची, बटाटा, फरसबी, चवळी, तूर व इतर शेंगवर्गिय पिके.

रंग : पिवळा

फायदे :

  • आपल्या क्षेत्रात किडीचा प्रादुर्भाव आहे किंवा नाही याचे निरीक्षण करण्यास मदत होते.
  • पिकाचे नुकसान कमी होण्यास मदत होते.
  • फायदेशीर किटकांना हानी पोहचत नाही.
  • वारा आणि जलरोधक.

सापळे वापरताना घ्यावयाची काळजी :

  • सापळा बांबूस बांधताना घट्ट बांधावा, त्यामुळे वाऱ्याने पडणार नाही.
  • ल्यूर लावताना हातास उग्र उदा. कांदा, लसूण यांच्यासारखा वास नसावा.
  • ल्यूरचे पॅकिंग फोडण्यापूर्वी ते फाटलेले नसल्याची खात्री करून घ्यावी.अन्यथा अपेक्षित परिणाम मिळणार नाही.
Back to Top