SAIPM फळमाशी सापळा

आंबा, चिकू, पपई, सफेद जांबू, जांभूळ, बोर, केळी या फळपिकांवर फळमाशीच्या विविध जाती आढळतात. यामध्ये बॅक्‍ट्रोसेरा डॉर्सेलिस ही जात आढळून येते. तसेच वेलवर्गीय भाज्या कारली, तोंडली, दोडके, कलिंगड, काकडी इत्यादी पिकांवर बॅक्‍ट्रोसेरा कुकरबीटी ही फळमाशीची जात आढळून येते. या सर्व फळमाश्‍यांचा सुमारे २५ ते ४० टक्के प्रादुर्भाव होतो. फळे बाजारात किंवा विक्री अवस्थेत असताना फळमाशीचा प्रादुर्भाव दिसत असल्याने फळे विक्री करताना अडचणी येतात.

फळमाशीचा प्रादुर्भाव :

  • फळमाशी वर्षभर कमी अधिक प्रमाणात इतर फळपिकांवर उपजीविका करत असते. परंतु आंबा किंवा इतर फळांच्या हंगामामध्ये फळमाश्‍यांची संख्या वाढते.
  • मादी फळमाशी तिच्या अंडनलिकेच्या साह्याने फळाच्या सालीखाली पुंजक्‍यात अंडी घालते. तेथेच पांढऱ्या रंगाच्या आणि डोक्‍याकडे निमुळत्या अशा लहान अळ्या तयार होतात.
  • अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या फळाच्या गरावर उपजीविका करतात. त्यामुळे अशी फळे कुजतात. अळीची पूर्ण वाढ झाल्यानंतर अळ्या जमिनीत कोषावस्थेत जाते. त्यामधून फळमाशीचे प्रौढ म्हणजेच माश्‍या बाहेर येऊन पुन्हा अंडी घालतात.
  • फळमाशीने प्रादुर्भावीत फळांची गुणवत्ता कमी होते. बाजारमूल्य मिळत नाही तसेच फळे खाण्यायोग्य राहत नाही.

पिके : आंबा, चिकू, पपई, सफरचंद, सफेद जांबू, जांभूळ, बोर, केळी, कारली, तोंडली, दोडले, टमाटर, वांगी, ढोबळी मिरची, कलिंगड, काकडी, संत्री, मोसंबी, छोटी काकडी, पीच, मनुका.

लक्षनीय किड : बैक्ट्रोसेरा डॉर्सालिस आणि बैक्ट्रोसेरा कुकूरबिटी

रंग : तळाशी पिवळा आणि वरचा स्पष्ट मानक रंग

फायदे :

  • फळे येण्यापूर्वीच सापळे लावल्यास शेतातील प्रौढ माशीची संख्या कमी होते. पर्यायाने प्रादुर्भाव कमी होतो. निर्यातक्षम उत्पादन घेणे शक्‍य होते.
  • पर्यावरणपूरक असल्याने सुरक्षित.
  • कीडनाशकांच्या तुलनेत स्वस्त.
  • पकडलेल्या फळ माशींचे निरीक्षण करणे अगदी सोपे.
  • वारा आणि जलरोधक.
  • अधिक सापळे अल्प काळात सेवा केले जाऊ शकते.
  • ३००० पेक्षा अधिक माश्या धारण करण्याची क्षमता.
  • निरीक्षणासाठी विविध प्रजातीच्या किडींचे जतन करणे आवश्यक.
  • पीकाचे नुकसान कमी होण्यास मदत होते.

सापळे लावण्याची पद्धती व प्रमाण : वरीलपैकी उपलब्ध सापळे एकरी ४ या प्रमाणात शेतामध्ये ४ ते ५ फूट किंवा पिकाच्या उंचीप्रमाणे शेतात अथवा झाडावर टांगून द्यावेत.

Back to Top