SAIPM फनेल ट्रॅप

वर्णन : कामगंध सापळा यास फनेल ट्रॅप देखील म्हणतात. हा नरसाळ्याच्या आकाराचा प्लॅस्टिकचा असून त्याच्या खाली प्लॅस्टिकची लटकती पिशवी असते. त्यावर पसरट झाकण अडकवता येते. या झाकणाच्या खालच्या बाजूस रबरी किंवा प्लॅस्टिकचा ल्यूर (सेप्टा) लावण्यास सोय असते. या ल्यूरमध्ये मादीचा वास असलेले अदृश्‍य रसायन लावलेले असते. त्यामुळे नर हा मिलनाकरिता मादीच्या शोधात कामगंध सापळ्याकडे आकर्षित होतो. त्यास आतील बाजूस 'आमिष' लावण्याची सोय असते. त्यास मादीचा वास असणारे एक रसायन लावण्यात येते. यामध्ये प्रौढ पतंग आल्यास तो अडकून पडतो. त्यास बाहेर निघणे शक्‍य नसते. असे जमा झालेले नर पतंग पाच-सात दिवसांत मरतात. अशा प्रकारे किडीची पुढील पिढी तयार होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत बाधा येते. त्यामुळे कीडनियंत्रण चांगल्या प्रकारे होते. अशा पद्धतीने प्रत्येक किडीसाठी वेगळा ल्यूर वापरून त्या त्या किडीचे व्यवस्थापन करता येते.

कार्य : नर कीटक हा मादीच्या मिलनासाठी त्या वासाने या सापळ्याकडे आकर्षित होतो, फनेलमध्ये येतो, घसरून खाली पिशवित पडतो व काही दिवसांनी मरतो. त्यांचे मिलन होत नाही, अंडी देण्याची प्रक्रिया थांबते. याद्वारे किडींच्या उत्पादनाचे नियंत्रण होते.

पिके: हरभरा, कोबी, मिरची, शेवंती, कापूस, चवळी, मूग, भुईमूग, भेंडी, तूर, तांदूळ, ज्वारी, सोयाबीन, सूर्यफूल, टोमॅटो, कापूस, वाटाणा, चणा, ज्वारी, मटार, तंबाखू, बटाटा आणि मका, बीट, वांगी, रताळे.

लक्षणीय कीड: Helicoverpa armigera (कापूस बोंडअळी), Pectinophora gossypiella (गुलाबी बोंडअळी), Scirpophaga incertulas (पिवळा खोडकीड), Earias vittella (ठिपकेदार बोंडअळी), Spodoptrea litura (पाने खाणारी अळी), Spodoptera frugiperda (मक्यावरील लष्करी अळी), Spodoptera exigua (बीट लष्करी अळी).

रंग: हिरवा

फायदे

  • हा सापळा मुख्यताः सर्व प्रकारच्या अळीवर्गीय किडींच्या पतंगासाठी तयार करण्यात आलेला आहे.
  • आपल्या क्षेत्रात किडीचा प्रादुर्भाव आहे किंवा नाही याचे निरीक्षण करण्यास मदत होते.
  • पीकाचे नुकसान कमी होण्यास मदत होते.
  • फायदेशीर किड्यांना हानी पोहचत नाही.
  • वारा आणि जलरोधक.

पिकांमध्ये वापरण्याचे प्रमाण

५ ते ७ प्रती एकर

सापळे वापरताना घ्यावयाची काळजी :

  • सापळा बांबूस बांधताना घट्ट बांधावा, त्यामुळे वाऱ्याने पडणार नाही.
  • ल्यूर लावताना हातास उग्र उदा. कांदा, लसूण यांच्यासारखा वास नसावा.
  • ल्यूरचे पॅकिंग फोडण्यापूर्वी ते फाटलेले नसल्याची खात्री करून घ्यावी.
  • पॅकिंग फाटलेले असले तर अपेक्षित परिणाम मिळत नाही.
  • जोराची हवा व पाऊस असल्यास सापळ्यांचे वेळोवेळी निरीक्षण करावे. सापळ्यात येणारे पावसाचे पाणी काढण्याची व्यवस्था ठेवावी.
  • सापळ्याची पिशवी बांबूस घट्ट बांधावी. त्यामुळे वाऱ्याने न फडफडता नुकसान होणार नाही.
  • ल्यूर वेळेवर बदलावेत. त्यामुळे अपेक्षित परिणाम मिळतात.
  • सापळ्यात अडकलेले पतंग मेल्यानंतर वेळच्या वेळी ते काढून टाकावेत. अन्यथा, कुत्रे, मांजर, पक्षी हे सापळ्यातील मेलेल्या पतंगाकडे आकर्षित होऊन सापळ्यास नुकसान होण्याची शक्‍यता असते. अशी परिस्थिती साधारणपणे मळ्याची वस्ती असणाऱ्या ठिकाणी आढळून येईल. सापळ्यात पावसाचे पाणी साचले व त्यात मेलेले पतंग असतील तर त्याचा दुर्गंध पाळीव कुत्र्यांस आकर्षित करतो. त्यामुळे कुत्रे अशा सापळ्यांचे नुकसान करतात. यासाठी सापळ्याच्या खालच्या बाजूस काट्याची फांदी लावल्यास फायदा मिळेल.
Back to Top