हाय नायट्रो

हाय नायट्रो विविध प्रकारच्या अखाद्य तेलरहीत पेंडीचे सर्वोत्तम मिश्रण आहे.जमिनीतील सुक्ष्म जिवाणूंना त्याच्या वाढीसाठी व कार्यक्षमतेसाठी प्रथिनांची गरज असते.हाय नायट्रो मध्ये ही प्रथिने भरपुर प्रमाणात असून यामधील पेंडीमधून ही प्रथीने उपलब्ध होतात.या सोबतच हाय नायट्रोमध्ये मुख्य, दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये सेंद्रीय स्वरुपात असल्याने पिकांची अन्नद्रव्याची गरज नैसर्गिकरित्या भागवली जाते.

एरंडी व करंज यांसारख्या अखाद्य पेंडीपासुन तयार केलेले हाय नायट्रो सेंद्रीय कर्बाचा उत्तम स्त्रोत आहे.

हाय नायट्रोमधील प्रमाण

घटक प्रमाण
सेंद्रिय कर्ब ४० - ४५ %
नत्र ९.५ - ११ %
स्फुरद(P2O5) ३.५ – ४.० %
पालाश(K2O) २.० – ३.० %
प्रथिने ५५ - ६० %

या शिवाय ह्यामध्ये पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.

ह्या घटकांचे प्रमाण प्रातिनिधीक स्वरुपाचे असून यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.

हाय नायट्रोचे फायदे

  • हाय नायट्रो मधील नत्र प्रथिनांच्या स्वरुपात असल्याने त्याचा उपयोग जमिनीतील सुक्ष्म जिवाणूंना त्याच्या वाढीसाठी तसेच कार्यक्षमतेसाठी खाद्य म्हणून होतो.
  • हाय नायट्रोमुळे जिवाणूंची कार्यक्षमता वाढून जमिनीचे भौतीक, रासायनिक तसेच जैविक गुणधर्म सुधारतात.
  • हाय नायट्रो तेलरहीत व पावडर स्वरुपात असल्याने यामधील अन्नद्रव्ये जलद गतीने पिकांना वाढीसाठी उपलब्ध होतात.
  • मुख्य, दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये सेंद्रीय स्वरुपात उपलब्ध होत असल्याने रासायनिक खतांचा वापर व त्यामुळे होणारे दुष्परीणाम सुध्दा कमी होतात.
  • हाय नायट्रोमधील पेंडींचे मिश्रण जमिनीचा भुसभुशीतपणा वाढवून जमिनीच्या सुपिकतेत भर घालते.
  • हाय नायट्रो पावडर स्वरुपात असल्याने जलद गतीने विघटीत होते व जमिनीच्या सेंद्रीय कर्बात भर घालते.
  • हाय नायट्रोमधील पेंडींमध्ये किटकनाशक व बुरशीनाशक गुणधर्म असल्याने पिकांचे किड व रोगांपासुन संरक्षण होते त्याचबरोबर जमिनीतील हानीकारक सुत्रकृमींपासूनही बचाव होतो.
  • नैसर्गिकरीत्या अन्नद्रव्ये उपलब्ध होत असल्याने पिकांची वाढ, फुलधारणा तसेच भाजीपाला व अन्नधान्यांच्या गुणवत्तेत वाढ होऊन उत्पादन वाढते.

वापरण्याचे प्रमाण:

एकरी ३०० ते ५०० किलो शक्यतो लागवडीच्या वेळी जमिनीतून द्यावे.

या शिवाय रासायनिक खत देताना १:१ या प्रमाणात मिसळून द्यावे.

उपलब्धता:

५० किलो बॅग

Back to Top