हाय एन पी के

आधुनिक शेतीमध्ये पिकांना आवश्यक असणार्‍या मुख्य, दुय्यम तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज प्रामुख्याने रासायनिक खतांचा वापर करून भागवली जाते. या अन्नद्रव्यांचा पुरवठा सेंद्रिय स्रोतांमधून करायचा असल्यास दर्जेदार, विश्वासार्ह व वाजवी दराचे पर्याय उपलब्ध नसल्याने अडचणी येतात. बाजारात मोठया प्रमाणात उपलब्ध असणार्‍या सेंद्रीय खतांमधून काही प्रमाणात सेंद्रीय कर्ब जरी उपलब्ध होत असला तरी या खतांमध्ये वनस्पतीस आवश्यक असणारी सर्व प्रकारची अन्नद्रव्ये मर्यादित प्रमाणात असतात.

वरील बाबींचा विचार करुन हाय एन पी के हे उत्पादन तयार करण्यात आले आहे. या उत्पादनाव्दारे वनस्पतीस आवश्यक असणारी मुख्य, दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये यांचा सेंद्रीय स्वरुपातील पुरवठा चांगल्या प्रमाणात होतोच शिवाय यामधील सेंद्रीय कर्ब जमिनीची सुपिकता वाढवण्यास मदत करते.

हाय एन पी के मधील घटक

घटक प्रमाण
सेंद्रिय कर्ब ३५ - ४० %
नत्र ४.५ – ५.५ %
स्फुरद (P2O5) ९.५ - ११ %
पालाश (K2O) ७.५ – ९.० %
प्रथिने २५ - ३० %

या शिवाय ह्यामध्ये पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.

ह्या घटकांचे प्रमाण प्रातिनिधीक स्वरुपाचे असून यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.

हाय एन पी के चे फायदे

  • नत्र, स्फुरद व पालाश ही मुख्य अन्नद्रव्ये सेंद्रीय स्वरुपात एकत्र व योग्य प्रमाणात (अंदाजे नत्र ५ %, स्फुरद १० % , पालाश ८ %) असल्याने रासायनीक खतांची गरज काही प्रमाणात कमी होते.
  • यामध्ये सेंद्रीय कर्बाचे प्रमाण जवळजवळ १५% पर्यंत आहे.
  • संपूर्ण सेंद्रीय असल्यामुळे जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता वाढविण्यास मदत होते.
  • नियमित वापराने जमिनीचे भौतिक, रासायनिक तसेच जैविक गुणधर्म सुधारतात.
  • पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणार्‍या मुख्य अन्नद्रव्यांसोबतच दुय्यम व सुक्ष्म अन्नद्रव्ये हाय एन पी के मध्ये योग्य प्रमाणात उपलब्ध असल्याने पिकांची योग्य वाढ होऊन वनस्पतींची पाने हिरवीगार राहतात त्यामुळे चयापचय क्रियेत वाढ होते.
  • हाय एन पी के च्या नियमित वापरामुळे जमिन भुसभुशीत होऊन क्षारांचा व पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो.
  • जमिनीचा सामु (पी.एच) उदासिन होण्यास मदत होते व वनस्पतीच्या पांढर्‍य़ा मुळांची वाढ चांगली होते.
  • हाय एन पी के संपूर्ण सेंद्रीय असल्याने त्यातील नत्र हवेत निघुन जात नाही किंवा त्याचा पाण्याद्वारे निचरा होत नाही तसेच स्फुरद, पालाश हळूहळू दीर्घकाळ उपलब्ध होत राहतात.
  • रासायनिक स्फुरदयुक्त खतांसोबत वापरल्यास स्फुरदाचे स्थिरीकरण कमी होते.
  • यासोबत नत्रयुक्त रासायनिक खते एकत्र वापरल्याने रासायनिक खतातील नत्र हवेत उडून न जाता व पाण्याद्वारे निचरा न होता दीर्घकाळ उपलब्ध होत राहतो.
  • हाय एन पी के शुध्दतेची हमी असलेले संपूर्ण सेंद्रीय खत आहे. फळझाडांना वापरल्यास फळांचा आकार, गोडी व टिकाऊपणा वाढतो.
  • हाय एन पी के जमिनीत नीट व सहज मिसळते तसेच वापरण्यास व साठवण्यास अत्यंत सोपे आहे.
  • हाय एन पी के मध्ये कीडी तसेच रोगांपासून पिकांचा बचाव करण्याचे गुणधर्म आहेत.
  • जिवाणू खतांसोबत हाय एन पी के वापरल्यास जमिनीमधील सुक्ष्म जिवाणूंच्या संख्येत तसेच कार्यक्षमतेमध्ये लक्षणीय वाढ होते. परिणामी अन्नद्रव्यांचे शोषण व उपलब्धता वाढण्यास मदत होते.

वापरण्याचे प्रमाण

एकरी ३०० ते ५०० किलो शक्यतो लागवडीच्या वेळी जमिनीतून द्यावे.

या शिवाय रासायनिक खत देताना १:१ या प्रमाणात मिसळून द्यावे.

उपलब्धता

४० किलो बॅग

Back to Top