• slidebg1
  LAB TIEUP FACILITY AVAILABLE
  for Micronutrient & PGR Manufacturers
 • slidebg1

  Proper Scientific Guidance

  For Bio Organic Farming

 • slidebg1

  Disease and Pest Diagnosis

  For Appropriate Control

नमस्कार

शेतीमध्ये रसायनांचा वाढत असलेल्या वापर व त्यांचे जमिनीच्या तसेच मानवी आरोग्यावर होणारे दुष्परीणाम टाळ्ण्यासाठी त्यांचा वापर मर्यादित करणे गरजेचे आहेच पण त्याच बरोबर रासायनिक खते व पिक संरक्षण रसायनांना योग्य ते सेंद्रीय / नैसर्गीक पर्याय उपलब्ध करुन देणेही तितकेच महत्वाचे आहे.

शेतक-यांमध्ये सेंद्रीय शेतीविषयी वाढत असलेली जागरुकता व ग्राहकांकडून विषमुक्त अन्नधान्ये, फळे, भाजीपाला यांची वाढत असलेली मागणी लक्षात घेता शेतक-याकडून सेंद्रीय / नैसर्गीक खते, जैविक खते, बुरशीनाशके, किटकनाशके, विविध प्रकारचे सापळे तसेच मित्र किडींचा वापर वाढू लागला आहे. शासन पातळीवरुनदेखील याबाबत वेगवेगळ्या योजनांद्वारे याचा प्रचार व प्रसार होत आहे.

येणा-या काळात या उत्पाद्नांची वाढणारी गरज लक्षात घेता उत्कष्ठ दर्जाची उत्पादने योग्य दरात शेतक-यांना पुरविणे महत्वाचे आहे.

या सर्व गोष्टीचा विचार करुन, सोनकुळ अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि. (पूर्वीचे बायो ऑरगॅनीक इंडस्ट्रीज) गेल्या २५ वर्षापासून नाशिक येथे शास्त्रीयदॄष्ट्या काटेकोरपणे ब्रॅंडेड सेंद्रीय खते, मशरुम कंपोस्ट, पेंडी व पेंडीची मिश्रणे, वनस्पती अर्क, चिकट तसेच कामगंध सापळे, जैविक खते, बुरशीनाशके, किटकनाशके, सुत्रकृमीनाशके, विषाणुजन्य किटकनाशके तसेच मित्र किडी यांचे कॄषीसंबंधीत विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन करत आहे.

त्याचबरोबर माती, पाणी, पानदेठ तसेच खते यांच्या परिक्षणाची शेतक-यांना असलेली गरज ओळखुन आमच्या बायो ऑरगॅनीक सोल्युशन्स या प्रयोगशाळेमार्फत अत्याधुनिक पृथक्करण यंत्रणा व दर्जेदार पृथक्करण रसायनांचा वापर करुन तज्ञ व अनुभवी तंत्रज्ञांकडून पृथक्करण तसेच पृथक्करण अहवालावर आधारित शिफारशीं सुयोग्य दरात पुरविल्या जातात.

Back to Top