जय फॉस (पोटॅश)

पिकांना आवश्यक असणार्‍या प्रमुख अन्नद्रव्यांपैकी स्फुरद व पालाश ही महत्वाची अन्नद्रव्ये आहेत. मुळांच्या तसेच फुलांच्या वाढीसाठी स्फुरदाची गरज असते. त्याचबरोबर फळांची गुणवत्ता, वजन व एकूण उत्पादनासाठी पालाश आवश्यक असते. रासायनिक स्फुरदयुक्त खतांमधील बहूतांश स्फुरद जमिनीमध्ये स्थिर होऊन त्याची उपलब्धता कमी होते. एकात्मीक अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी उत्तम सेंद्रीय पर्याय उपलब्ध करुन देणे महत्वाचे ठरते.

जय फॉस (पोटॅश) संपूर्णतः नैसर्गिक उत्पादन असुन सेंद्रीय स्वरुपातील २०-२५ % स्फुरद व १५-२० % पालाश यामधुन पिकांना उपलब्ध होतो. याशिवाय दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्यांचे भरपूर प्रमाण असल्याने एक पूर्णतः संतुलीत सेंद्रीय खत म्हणून जय फॉस (पोटॅश) उपयुक्त ठरते. यामधील सर्व अन्नद्रव्ये सेंद्रीय स्वरुपात असल्याने ते दिर्घकाळापर्यंत गरजेनुसार पिकांना शोषणासाठी उपलब्ध होत राहतात.

विविध प्रकारची अन्नधान्ये, फळे, फुले तसेच भाजीपाला पिकांसाठी जय फॉस (पोटॅश) एक उत्तम पर्याय आहे.

जय फॉस (पोटॅश) मधील घटक

घटक प्रमाण
स्फुरद १५ – ३५ %
पालाश १२ - २० %

या शिवाय ह्यामध्ये पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.

ह्या घटकांचे प्रमाण प्रातिनिधीक स्वरुपाचे असून यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.

जय फॉस (पोटॅश) चे फायदे

  • जय फॉस (पोटॅश) स्फुरद, पालाश, दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्यांचा नैसर्गिक स्त्रोत आहे.
  • पिकांच्या गरजेनुसार दिर्घकाळापर्यंत अन्नद्रव्यांची उपलब्धता व पर्यायाने मुळांद्‍वारे शोषण होते.
  • मुळांच्या वाढीला प्रोत्साहन मिळत असल्याने अन्नद्रव्यांचे शोषण जलद गतीने होते.
  • फुलांची वाढ, फळधारणा तसेच फळांच्या गुणवत्तेत वाढ होते.
  • फुलांचे फळांमध्ये रुपांतर होण्याच्या प्रमाणात वाढ होते.
  • पिकांचे नैसर्गिकरित्या पोषण होत असल्याने किड व रोगांचा चांगल्या प्रकारे प्रतिकार होतो.
  • जमिनीतील फायदेशीर सुक्ष्म जिवाणूंच्या संख्येत व कार्यक्षमतेत वाढ होते.
  • जमिनीचे एकंदर आरोग्य सुधारुन सुपिकता वाढते.
  • जय फॉस (पोटॅश) रासायनिक खतांना एक उत्तम पर्याय असुन याच्या वापराने रासायनिक खतांचा वापर लक्षणीयरीत्या कमी करता येतो.
  • सुक्ष्म जिवाणूंना आवश्यक असणारी प्रथिने व पिक वाढ संप्रेरके यांचा नियमीत पुरवठा होतो.

वापरण्याचे प्रमाण:

एकरी ३०० ते ५०० किलो शक्यतो लागवडीच्या वेळी जमिनीतून द्यावे.

या शिवाय रासायनिक खत देताना १:१ या प्रमाणात मिसळून द्यावे.

उपलब्धता:

२५ किलो बॅग

Back to Top