मोहा पेंड

मोहाच्या बीयां पासून तेल काढल्यानंतर उरणारी पेंड प्रथीनांचा उत्तम स्रोत असून शेतीमध्ये सेंद्रीय़ खत म्हणून वापरली जाते. मोहाची पेंड इतर पेंडींसोबत सुध्दा मिसळून वापरली जाऊ शकते. अन्नद्रव्य पुरवठ्यासोबतच यामध्ये किटकनाशक गुणधर्म असतात.

मोहा पेंडी मधील अन्नद्रव्यांचे प्रमाण

घटक प्रमाण
नत्र २ – ४ %
स्फुरद (P2O5) १ – ३ %
पालाश (K2O) २ – ४ %
प्रथिने १५ - २० %

फायदे

  • जमिनीची सुपिकता वाढवणारे उत्तम सेंद्रीय खत.
  • पिकांचे किड रोगांपासून संरक्षण करते.
  • जमीनीचा सेंद्रीय कर्ब तसेच जलधारणा शक्ती वाढवते.
  • मुख्य, दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करते.
  • नत्रयुक्त रासायनिक खतासोबत वापरल्यास नत्राचा –हास कमी करुन त्याचे मुळांद्वारे शोषण वाढवते.
  • जमीनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणर्धम सुधारतात.
Back to Top