एन ऑईल

घटक: Botanical Extract – 90%
Emulsifier – 10%

एन ऑईल पाण्यामध्ये सहज मिसळणारा वनस्पतीजन्य अर्क आहे. पिकांवर येणार्‍या विविध प्रकारच्या किडींना पिकावर हल्ला करण्यापासून परावृत्त करते. त्याचबरोबर त्यांची खाण्याची क्षमता व वाढ प्रभावीत करून पिकांचा बचाव करते. याच्या वापराने किडींमध्ये कुठलीही प्रतिकारक्षमता तयार होत नसल्याने तसेच हे सहजपणे नैसर्गिकरीत्या नष्ट होत असल्याने वेळोवेळी वापरण्यासाठी अगदी सुरक्षीत आहे. किडींबरोबरच विविध प्रकारच्या हानीकारक बुरशी तसेच जिवाणूंच्या व्यवस्थापनासाठीही उपयुक्त आहे

मावा, पाने गुंडाळणारी किड, भुंगेरे, कळीवर येणार्‍या अळ्या, कोळी, तुडतुडे, फुलकीडे, सूत्रकृमी, पांढरी माशी यांसारख्या किडी तसेच विविध रोगांच्या व्यवस्थापनासाठी एन ऑईल उपयोगी आहे.

सर्व प्रकारच्या फुले, फळे, भाजीपाला तसेच अन्नधान्य पिकांवर एन ऑईलचा प्रभावीपणे वापर करता येतो.

एन ऑईल पिकांवरील मित्र किटक, मधमाशा, पक्षी, जनावरे तसेच मनुष्यप्राण्यांसाठी संपुर्णतः सुरक्षीत आहे.

एन ऑईल पुर्णपणे रसायनमुक्त व पर्यावरणपुरक उत्पादन असून रसायनांना एक प्रभावी पर्याय आहे.

वापरण्याचे प्रमाण

४-५ मिली एन ऑईल प्रती लिटर पाण्यामध्ये फवारणीसाठी वापरावे. चांगल्या परिणामांसाठी फवारणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशीरा करावी.

उपलब्धता

१ लिटर / ५ लिटर

Back to Top