परलाईट

जगभरामध्ये मातीविरहीत शेतीमध्ये पिके वाढवण्यासाठी माध्यम किंवा माध्यमाचा भाग म्हणून परलाईट वापरले जाते. झाडांच्या वाढीसाठी मुळांभोवती पाणी व हवेचे योग्य संतुलन राखण्यासाठी परलाईट उपयोगी ठरते. हायड्रोपॉनीक्स मध्ये उत्पादन व दर्जा वाढीसाठी परलाईट चांगल्या प्रकारे मदत करते. संतुलीत सामू, निर्जंतूकपणा, हलके वजन या वैशीष्ठ्यांमुळे परलाईट हरितगृहे, रोपवाटिका, उद्याने तसेच परसबागेमध्ये यशस्वीपणे वापरता येते.

गुणधर्म

रंग राखाडी ( करडा )
विशीष्ट गुरुत्व २.२ – २.४
दृष्य घनता १२० – २२० कि / घ . मी
सामू ७.०
जलधारणा क्षमता २०० – ६०० % वजनानुसार
कणांचा आकार ६ – २० आय . एस. मानक

फायदे

  • परलाईट मुळे ऑक्सीजन, ओलावा तसेच अन्नद्र्व्ये संतुलीत प्रमाणात पिकांना उपलब्ध होतात.
  • कणांच्या खास आकारामुळे पाणी तसेच अन्नद्र्व्ये कणांना चिकटून राहतात व पिकांच्या गरजेनुसार उपलब्ध होतात.
  • कणांची खास रचना अतीरीक्त पाण्याचा लगेच निचरा करुन ऑक्सीजनसाठी जागा तयार करते.
  • परलाईटच्या कणांना पाण्याचे थेंब चिकटून रहात असल्याने त्यांची गरजेपेक्षा जास्त निचरा तसेच बाष्पीभवन रोखले जाते व पिकांच्या आवश्यकतेनुसार मुळांद्वारे शोषणासाठी उपलब्ध करुन दिले जाते.
  • पाणी व अन्नद्रव्यांचा –हास रोखला जातो.
  • पिकांच्या मुळांभोवती सातत्याने संतुलीत प्रमाणात ओलावा राखला जाऊन वाढीस प्रोत्साहन मिळते.
Back to Top