बियाणे उगवण क्षमता

दर्जेदार पिकासाठी बियाण्याचा दर्जा महत्वाचा असतो. बियाण्याची भौतिक शुध्दता, त्यामधील ओलावा, उगवणक्षमता या गोष्टी बियाण्याची गुणवत्ता ठरवत असतात. आमच्या प्रयोगशाळेमध्ये बियाण्यासंदर्भात खालील तपासण्या केल्या जातात.

१) ओलावा :- बियाण्याची साठवणक्षमता तसेच त्यानंतरची उगवणक्षमता बियाण्यामधील ओलाव्यावर अवलंबून असते.

२) उगवणक्षमता (%) :- एकरी वापरण्याचे बियाण्याचे प्रमाण तसेच बीजप्रक्रियेची गरज समजून घेण्यासाठी बियाण्याची उगवण क्षमता तपासणे गरजेचे असते.

३) भौतिक शुध्दता :- बियाण्यामध्ये असलेले वेगवेगळे भौतीक भेसळ घटक यामध्ये तपासले जातात.

Back to Top