बायो स्टीकी ट्रॅप्स (चिकट सापळे)

बायो स्टीकी ट्रॅप्स (चिकट सापळे) पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फळमाशी, फुलकीडे, नागअळी व पतंगांसारख्या किडींना रंगाद्वारे आकर्षीत करुन त्यांचे नियंत्रण करण्यासाठी खास तयार करण्यात आले आहेत. दर्जेदार, टिकाऊ, अतीनील किरणांना प्रतिकारक प्लॅस्टीकपासून तयार केलेल्या चिकट सापळ्यांमध्ये वासरहीत, अतिशय चिकट, न वितळणारा, कोरडा न पडणारा डिंक वापरण्यात आला असून त्यामूळे उन्हाची तीव्रता आणि पावसामुळे यांचा रंग व चिकटपणा कमी न होता दिर्घकाळापर्यंत किडनियंत्रण होते. एकात्मीक कीड नियंत्रणामध्ये चिकट सापळ्यांच्या वापराला सर्वाधिक महत्व आहे.

बायो स्टीकी ट्रॅप्स ची वैशिष्ठ्ये:

  • पर्यावरणपुरक
  • दिर्घकाळ टिकण्याची क्षमता
  • किटकांची रंगाकर्षता विचारात घेऊन २ रंगांमध्ये उपलब्ध (पिवळा व निळा)
  • ऊत्कृष्ठ दर्जाचा डिंक – कमी तापमानात न गोठणारा आणि जास्त तापमान / उन्हामुळे न वितळणारा.
  • संपुर्णतः विषमुक्त. कुठलेही रासायनीक घटक नाहीत.
  • दर्जेदार प्लॅस्टीकमुळे सापळॆ कुजत नाहीत अथवा त्यांचा रंग फिका पडत नाही.
  • कीटकनाशकांच्या फवारणीमुळे किंवा पावसामुळे डिंकाची कार्यक्षमता कमी होत नाही.
  • सर्व प्रकारच्या फळे, भाजीपाला, फुलपिके तसेच पॉलीहाऊस / शेडनेट मध्ये वापरता येतात.
  • सुरुवातीच्या काळातच किटकांचे नियंत्रण होत असल्याने फवारणीचा खर्च वाचतो.
  • चिकटलेल्या किटकांच्या संख्येवरून किटकनाशके फवारणीचे नियोजन करता येते; परिणामी फवारण्यांची संख्या कमी करता येऊन अनावश्यक फवारणी टाळता येते.

बायो स्टीकी ट्रॅप्स वापरण्याची पद्धत:

  • बाहेरील बाजुस असलेल्या सापळ्यांचा कागद (बटर पेपर) वेगळा करावा.
  • कमी उंचीच्या पिकांसाठी शेंड्यापासून जास्तीत जास्त ३० सें.मी. उंचीवर दोरी, तार, बांबू किंवा काठीच्या सहाय्याने टांगुन ठेवावे.
  • उंच वाढणार्‍या पिकांसाठी झाडांच्या शेंड्याजवळ दोरी, तार किंवा काठीच्या सहाय्याने टांगुन ठेवावे. झाडांची वाढ जसजशी होईल तसतशी सापळ्यांची उंची वाढवावी.
  • सापळे एकमेकांपासून ५ ते १० मिटर अंतरावर लावावेत.
  • सापळ्याचा पृष्ठभाग चिकटलेल्या किटकांनी भरल्यानंतर सापळे बदलावेत.
  • थ्रिप्स (फुलकिडे) ची संख्या जास्त असल्यास पिवळ्या सापळ्यांसोबत निळे सापळे ४:१ या प्रमाणात वापरावेत.

एकरी प्रमाण: ५० ते १५० सापळे. एकरी झाडांची संख्या, लागवडीचे अंतर, किटकांची संख्या व झाडांच्या उंचीनुसार एकरी संख्या कमीजास्त करावी.

उपलब्धता:

रंग: पिवळा व निळा

आकार: ६ इंच x ८ इंच / १२ इंच x ८ इंच

जाडी: २.५ मि.मी.

पॅकींग: १० / २५ सापळे

Back to Top