सन बायो अ‍ॅसिटो

Nitrogen Fixing Bacteria Acetobacter (CFU: 1 x 108 Cells / ml)

सन बायो अ‍ॅसिटो (अ‍ॅसिटोबॅक्टर) सहजीवी पध्दतीने हवेतील नत्र स्थिर करुन देणारे जिवाणू असून ऊसासारख्या पिकांच्या अंतर्गत उतींमध्ये राहून हे जिवाणू नत्र स्थिरीकरण करु शकतात. याबरोबरच विविध प्रकारची विकरे तसेच पिक वाढ संजीवके निर्माण करुन पिकांच्या वाढीमध्ये तसेच उत्पादनामध्ये वाढ करण्यास मदत करतात.

फ़ायदे:

  • सर्वाधिक नत्र स्थिर करण्याची क्षमता.
  • उसासारख्या पिकांसाठी अत्यंत उपयुक्त.
  • उसांच्या मुळे, खोड तसेच पानांमध्ये राहुन सहजीवीपणे नत्र स्थिर करण्याची क्षमता.
  • नत्राबरोबरच काही प्रमाणात स्फ़ुरदचीही उपलब्धता वाढवीते.
  • उसाच्या एकून नत्राच्या गरजेच्या ८०% पर्यंत नत्र स्थिर करु शकतात.

पिके: ऊस आणि तृणधान्य पिके

वापरण्याचे प्रमाण:

बेणे प्रक्रिया

१० मिली सन बायो अ‍ॅसिटो १ लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये ३० मिनीटांसाठी बेणे बुडवून ठेवावे. त्यानंतर १ तासाच्या आत बेणे लागवड करावी.

जमिनीतून

लागवडीनंतर ३ महीन्याच्या आत १-२ लिटर सन बायो अ‍ॅसिटो १०० किलो शेणखतामध्ये मिसळून जमिन ओली असताना पसरुन द्‍य़ावे.

ठिबक सिंचनामधून (प्रती एकर)

१-२ लिटर सन बायो अ‍ॅसिटो पाण्यामध्ये मिसळून ठिबक सिंचनाद्‍वारे द्‍यावे.

उपलब्धता

१००० मीली / ५००० मीली / १ किलो

Back to Top