सन बायो अ‍ॅम्पेलो (Ampelomyces quisqualis)

Ampelomyces quisqualis (1 x 108 Cells / ml)

सन बायो अ‍ॅम्पेलो निसर्गामध्ये आढळणार्‍या उपयुक्त जिवाणूंपासून तयार केलेले उत्पादन असून विविध पिकांवर येणार्‍या भुरीपासून पिकसंरक्षण करण्यास सक्षम आहे. यामधील जिवाणू निसर्गतःच हानीकारक भुरीचे शत्रू आहेत. भुरीच्या बुरशीच्या शरीरात व शरीरावर वाढून हे जिवाणू भुरीच्या बुरशीच्या वाढीचा वेग कमी करून तिचा नाश करतात. फळे, भाजीपाला तसेच फुलपिकांवर येणार्‍या सर्व प्रकारच्या भुरींवर सन बायो अ‍ॅम्पेलो च्या वापराने नियंत्रण मिळण्यास मदत होते.

सन बायो अ‍ॅम्पेलो ची कार्यपद्धती

  • सन बायो अ‍ॅम्पेलो च्या फवारणीनंतर यामधील उपयुक्त जिवाणू भुरीच्या बुरशीच्या शरीरावर हल्ला करतात. बुरशीच्या पेशीभित्तीकेमधून प्रवेश करून हे जिवाणू स्वतःची वाढ करून घेताना पेशीद्रव्याचा नाश करतात.
  • सन बायो अ‍ॅम्पेलो मधील जिवाणू भुरीच्या बुरशीबरोबर अन्नद्रव्य मिळविण्याकरिता स्पर्धा करतात. परिणामी रोगकारक बुरशींना अन्न न मिळाल्यामुळे त्यांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होऊन त्यांची वाढ खुंटते.
  • याबरोबरच हे जिवाणू रोगकारक बुरशीच्या पेशींमधून अन्नद्रव्ये शोषण करून स्वतःची वाढ करून घेतात. परिणामी बुरशींच्या पेशींचा नाश होतो.
  • सन बायो अ‍ॅम्पेलो मधील जिवाणूंची वाढ होत असतान विविध प्रकारची प्रतिजैविके तयार होतात. या प्रतिजैविकांमुळे विविध प्रकारच्या रोगकारक बुरशींचा नाश होतो.
  • सन बायो अ‍ॅम्पेलो मधील जिवाणू विकरे (एन्झाईम्स) तयार करतात. ही विकरे रोगकारक बुरशींच्या पेशीभित्तीका नष्ट करून त्यांच्यावर नियंत्रण मिळवतात.
  • रोगकारक बुरशी व जिवाणूंमध्ये रासायनिक बुरशीनाशकांच्या सतत वापरामुळे येणारी प्रतिकारक्षमता सन बायो अ‍ॅम्पेलो च्या वापराने येत नाही. त्यामुळे सन बायो अ‍ॅम्पेलो रोगनियंत्रणासाठी नेहमीच प्रभावी ठरते.

वापरण्याचे प्रमाण

फवारणीमधून: ५ मिली सन बायो अ‍ॅम्पेलो प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशीरा फवारणी करावी.

सन बायो अ‍ॅम्पेलो वापरण्याच्या अगोदर व नंतर कुठल्याही रासायनिक बुरशीनाशकाचा वापर करू नये.

उपलब्धता

१००० मिली / ५००० मिली

Back to Top