सन बायो अ‍ॅझो

Nitrogen Fixing Bacteria Azotobacter (CFU: 1 X 108 Cells / ml)

सन बायो अ‍ॅझो (अ‍ॅझोटोबॅक्टर) हवेतील नत्र असहजीवी पध्दतीने स्थिर करुन पिकांना उपलब्ध करुन देणार्‍या सुक्ष्म जिवाणूंचे मिश्रण असून नत्र स्थिरीकरणासोबतच विविध प्रकारची वाढ संजिवके तयार करून पिकांच्या वाढीला मदत करतात.

फायदे:

  • असहजीवी पध्दतीने हवेतील नत्र स्थिर करण्यास सक्षम.
  • जमिनीतील सुक्ष्म जिवाणूंची संख्या वाढून जमिनीच्या एकंदर आरोग्यात सुधारणा होते.
  • रासायनिक नत्र खतांच्या वापरामध्ये २५ % पर्यंत घट होते.
  • हेक्टरी २० ते २५ किलो नत्र स्थिर करण्याची क्षमता.
  • नत्र स्थिरीकरणासोबत विविध प्रकारची विकरे तसेच संजीवके तयार करत असल्याने पिकांच्या वाढीस चालना मिळते.
  • काही प्रमाणात बुरशीजन्य रोगांचा प्रतीकार करणारी द्रव्ये निर्माण होत असल्याने रोगांपासुन बचाव होतो.
  • पिकांच्या उत्पादनात २०-२५% पर्यंत वाढ शक्य.

पिके: अन्नधान्ये, फळे, भाजीपाला, फुले, कापूस व इतर पिके.

वापरण्याचे प्रमाण:

बिज / बेणे प्रक्रिया (प्रती किलो)

१० मीली ग्रॅम सन बायो अ‍ॅझो थंड गुळाच्या द्रावणात मिसळून बियाण्यास चोळावे. बियाणे सावलीत सुकवून त्याच दिवशी पेरणी करावी.

रोपे प्रक्रिया

सन बायो अ‍ॅझो १० मीली / लिटर पाण्यामध्ये मिसळून रोपांची मुळे ५-१० मिनीटांसाठी बुडवून ठेवावीत व नंतर लागवड करावी.

जमिनीमधुन (प्रती एकर)

१-२ लिटर सन बायो अ‍ॅझो १०० किलो शेणखतात / पेंडीमध्ये मिसळून जमिनीत पुरेसा ओलावा असताना पसरुन द्‍यावे.

आळवणी

१० मीली सन बायो अ‍ॅझो प्रती लिटर पाण्यात मिसळून मुळांजवळ आळवणी करावी.

ठिबक सिंचनामधून (प्रती एकर)

१-२ लिटर सन बायो अ‍ॅझो पुरेश्या पाण्यामध्ये मिसळून ठिबक द्‌वारे द्‍यावे.

उपलब्धता

१००० मीली / ५००० मीली / १ किलो

Back to Top