सन बायो अ‍ॅझोस

Nitrogen Fixing Bacteria Azospirillum : (CFU: 1 X 108 Cells / ml)

सन बायो अ‍ॅझोस (अ‍ॅझोस्पिरिलीयम) पिकांच्या मुळांभोवती व मुळांमध्ये वास्तव्य करुन हवेतील नत्र स्थिर करणारे जिवाणू असून पिकांच्या गरजेच्या ३०-५० % नत्र उपलब्ध करुन देऊ शकतात. प्रतीकूल परिस्थीतीमध्ये सुप्तावस्थेत जाण्याच्या यांच्या गुणधर्मामुळे अधिक काळापर्यंत जमिनीमध्ये कार्यक्षम राहु शकतात.

फ़ायदे

  • हेक्टरी १५-२० किलो नत्र स्थिरीकरण करण्याची क्षमता.
  • नत्र स्थिरीकरणासोबतच बुरशीनाशक द्रव्ये तयार करण्याच्या क्षमतेमुळे पिकाचे रोगांपासुन संरक्षण होते.
  • रासायनिक नत्र खतांच्या वापरात ३०% पर्यंत बचत शक्य.
  • बीयाण्यांची उगवण क्षमता, पिकांची वाढ, गुणवत्ता तसेच उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
  • जमिनीमधील सुक्ष्म जिवांची संख्या वाढुन मातीचे आरोग्य सुधारते.

पिके: अन्नधान्ये, फळे, भाजीपाला, ऊस, फुले तसेच इतर पिके.

वापरण्याचे प्रमाण

बिज प्रक्रिया (प्रती किलो)

१० मीली / सन बायो अ‍ॅझोस थंड गुळाच्या द्रावणात मिसळून बियाण्यास चोळावे. बियाणे सावलीत सुकवून त्याच दिवशी पेरणी करावी.

रोपे प्रक्रिया

१० मीली सन बायो अ‍ॅझो्स / लिटर पाण्यामध्ये मिसळून रोपांची मुळे ५-१० मिनीटांसाठी बुडवून ठेवावीत व नंतर लागवड करावी.

जमिनीमधुन (प्रती एकर)

१-२ लिटर सन बायो अ‍ॅझो्स १०० किलो शेणखतात / पेंडीमध्ये मिसळून जमिनीत पुरेसा ओलावा असताना पसरुन द्‍यावे.

आळवणी

१० मीली सन बायो अ‍ॅझो्स प्रती लिटर पाण्यात मिसळून मुळांजवळ आळवणी करावी.

ठिबक सिंचनामधून (प्रती एकर)

१-२ लिटर सन बायो अ‍ॅझो्स पुरेश्या पाण्यामध्ये मिसळून ठिबक द्‌वारे द्‍यावे.

उपलब्धता

१००० मीली / ५००० मीली / १ किलो

Back to Top