सन बायो बॅसिल (Bacillus subtilis)

CFU:Bacillus subtilis (1 x 108 Cells / ml)

सन बायो बॅसिल जिवाणूजन्य बुरशीनाशक असून यामधील बॅसिलस सबटीलीस हे जिवाणू अनेक प्रकारच्या रोगकारक बुरशींच्या नियंत्रणासाठी उपयोगी असून त्याचबरोबर जमिनीतील सुत्रकृमींच्या नियंत्रणासाठी परिणामकारक आहे. द्राक्षावरील लवकरचा करपा, भुरी तसेच डाऊनी मिल्ड्यू व्यवस्थापनासाठी याचा प्रभावी वापर करता येतो. त्याचबरोबर भाजीपाला आणि फुलपिकांमधील मर रोग आणि सुत्रकृमींसाठीही उपयुक्त आहे.

सन बायो बॅसिल ची कार्यपद्धती

  • सन बायो बॅसिल मधील जिवाणू पिकांच्या मुळांजवळ आपली संख्या वाढवून रोगकारक जिवाणू तसेच बुरशींबरोबर अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा करतात. परिणामी रोगकारक जिवाणू व बुरशींच्या वाढीला अटकाव होतो.
  • हे उपयुक्त जिवाणू दिर्घकाळापर्यंत मुळांजवळ सक्रिय रहात असल्याने पिकांच्या वाढीच्या प्रत्येक अवस्थेमध्ये रोगांपासून संरक्षण मिळते.
  • सन बायो बॅसिल चा वापर सन बायो डर्मा व सन बायो मोनस सोबत केल्याने अधिक चांगला परिणाम मिळतो.
  • सन बायो बॅसिल मधील जिवाणू रोगकारक बुरशींच्या शरीराचा वापर अन्नद्रव्यांचा स्रोत म्हणून करतात व त्यांच्या शरीरामध्ये स्वतःची वाढ करतात. परिणामी या बुरशींचा नाश होतो.
  • सन बायो बॅसिल पिकांच्या मुळांच्या सान्निध्यात वास्तव्य करीत असल्याने हानीकारक बुरशी पिकांच्या मुळांपर्यंत पोचण्याआधीच त्यांचे नियंत्रण करतात.
  • सन बायो बॅसिल मधील जिवाणू स्वतःची वाढ करताना विविध प्रकारची प्रतिजैविके व विकरे तयार करतात. त्यामुळे हानीकारक बुरशींच्या जिवनचक्रात अडथळे निर्माण होऊन त्यांच्या वाढीचा वेग मंदावतो.

वापरण्याचे प्रमाण

जमिनीतून

प्रती एकर १ लिटर सन बायो बॅसिल ५० - १०० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून द्यावे.

ठिबक सिंचनामधून

प्रती एकर १ लिटर सन बायो बॅसिल ठिबक सिंचनाद्वारे मुळांशी द्यावे.

आळवणीसाठी

१० मिली सन बायो बॅसिल प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी.

फवारणीमधून

५ मिली सन बायो बॅसिल प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशीरा फवारणी करावी.

बीज/बेणे/कंद प्रक्रिया

१० मिली सन बायो बॅसिल प्रती किलो या प्रमाणात पाण्यात मिसळून बीज/बेणे/कंद प्रक्रिया करावी.

सन बायो बॅसिल वापरण्याच्या अगोदर व नंतर कुठल्याही रासायनिक बुरशीनाशकाचा वापर करू नये.

उपलब्धता

१००० मिली / ५००० मिली

Back to Top