सन बायो बेव्हीगार्ड (Beauveria bassiana / Beauveria brongniartii)

Beauveria bassiana/brongniartii  (1 x 108 Cells / ml)

सन बायो बेव्हीगार्ड हे एक जैविक कीडनाशक असून यामधील बुरशी पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फुलकीडे, उडद्या, हुमणी, खोडकीड, शेंडेअळी, बोंडअळी यासारख्या किडींच्या नियंत्रणाकरीता प्रभावी आहे. रासायनिक किटकनाशकांना दाद न देणार्‍या किटकांच्या नियंत्रणासाठी सन बायो बेव्हीगार्ड हा एक उत्तम पर्याय आहे. सन बायो बेव्हीगार्ड चा वापर कापूस, सर्व प्रकारचा भाजीपाला व फळपीके यांच्यावर येणार्‍या किडींसाठी प्रामुख्याने होतो.

सन बायो बेव्हीगार्ड ची कार्यपद्धती

  • सन बायो बेव्हीगार्ड ची फवारणी केल्यानंतर यामधील बुरशीचे बीजकण किडीच्या अंगास चिकटतात किंवा किडींच्या अंगावरील केसांत अडकतात.
  • हवेतील ओलावा, पिकांच्या पानांमधून तसेच जमिनीतून होणारे पाण्याचे बाष्पीभवन यांचा उपयोग करून सन बायो बेव्हीगार्ड मधील बुरशीचे बीजकण कीडींच्या अंगावर वाढून किडींच्या शरीरात शिरतात.
  • कीडींच्या शरिरातील रसाचा उपयोग करून सन बायो बेव्हीगार्ड मधील बुरशीचे बीजकण स्वतःची वाढ करून घेतात व किटकांचे शरीर या वाढीने भरून जाते यामुळे किटकांच्या शरीराला कडकपणा येऊन त्यांचा मॄत्यू होतो.
  • कीटकांच्या शरीरावर व शरीराच्या आत वाढ होताना हे बीजकण विविध प्रकारची विषारी द्रव्ये किडींच्या शरीरामध्ये सोडतात. यामुळे किडी रोगग्रस्त होऊन त्यांचे नियंत्रण होते.
  • रासायनिक किटकनाशकांना दाद न देणार्‍या जाड त्वचेच्या किडींच्या नियंत्रणासाठी सन बायो बेव्हीगार्ड प्रभावी आहे.

वापरण्याचे प्रमाण

रसशोषक किडींसाठी

फवारणीमधून

५ मिली सन बायो बेव्हीगार्ड प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशीरा फवारणी करावी. हवामान कोरडे असल्यास योग्य आर्द्रता राहण्यासाठी फवारणीनंतर लगेच पिकास पाणी द्यावे.

हुमणीसाठी

जमिनीतून

प्रती एकर १ लिटर सन बायो बेव्हीगार्ड ५० - १०० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून द्यावे.

ठिबक सिंचनामधून

प्रती एकर १ - २ लिटर सन बायो बेव्हीगार्ड ठिबक सिंचनाद्वारे मुळांशी द्यावे.

आळवणीसाठी

५ - १० मिली सन बायो बेव्हीगार्ड प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी.

सन बायो बेव्हीगार्ड वापरण्याच्या ३-५ दिवस अगोदर व नंतर कुठल्याही रासायनिक बुरशीनाशकाचा वापर करू नये.

उपलब्धता

१००० मिली / ५००० मिली

Back to Top