सन बायो कॉम्पॅक्ट

घटक: (CFU: Rhizobium or Azotobacter or Azospirillum: 1 X 108 per ml PSB: 1 X 108 per ml KSB: 1 X 108 per ml)

सन बायो कॉम्पॅक्ट सेंद्रीय पदार्थांना प्रभावीपणे व वेगाने कुजवीणार्‍या नैसर्गिक सुक्ष्म जिवाणूंचे मिश्रण असून याच्या वापराने शेण, पिकांचे अवशेष, मळी, तसेच इतर सेंद्रीय पदार्थ कुजविण्याची प्रक्रीया चांगल्या पध्दतीने होते. संपूर्णतः नैसर्गिक उत्पादन असल्याने कमीत कमी वेळेत चांगल्या प्रकारचे सेंद्रीय खत निर्मीतीसाठी याचा उपयोग होतो.

फायदे

  • वेगाने कुजविण्याच्या क्षमतेमुळे ६-८ आठवडयात उत्तम प्रतीचे सेंद्रीय खत तयार होते.
  • खत तयार होताना वाढणार्‍या तापमानास जिवाणू मिश्रण सहनशिल असल्याने वाढत्या तापमानातही कार्यरत असते.
  • कुजविण्याच्या प्रक्रियेत तापमानात वाढ होत असल्याने सेंद्रीय पदार्थांमधील हानीकारक बुरशी, जिवाणू तसेच तणांच्या बियांचा बंदोबस्त होतो.
  • कुजविण्याबरोबरच विविध प्रकारची पिक वाढ संप्रेरके तयार होत असल्याने सेंद्रीय खताची गुणवत्ता वाढते.
  • वेगाने कुजवीण्याच्या प्रक्रियेमुळे सेंद्रीय पदार्थांचा घाण वास येत नाही.
  • तयार झालेले सेंद्रीय खत सर्व प्रकारच्या पिकांना वापरता येते.

वापरण्याची पध्दत व प्रमाण

१ टन सेंद्रीय पदार्थांचा ढीग ओला करुन रात्रभर मुरु द्‍यावा. दुसर्‍या दिवशी सावलीमध्ये त्याची १ मीटर उंचीची पोळ तयार करुन घ्यावी. ५०-१०० लिटर पाण्यामध्ये १ लिटर सन बायो कॉम्पॅक्ट मिसळून त्याची पोळेवर फवारणी करावी. पुरेसे ओले झाल्यानंतर गोणपाट कींवा प्लॅस्टिक फिल्मने झाकुन ठेवावे. कुजण्याची प्रक्रीया चांगली होण्यासाठी अधून मधून ढीग उघडून बघावा व गरज असल्यास पाणी शिंपडावे. सेंद्रीय पदार्थांचा ढीग मूळ आकाराच्या २५% झाल्यानंतर व उष्णता बाहेर निघुन गेल्यावर चांगल्या प्रतीचे सेंद्रीय खत वापरासाठी तयार असते.

ठिबक सिंचनामधुन (प्रती एकर)

जमिनीमधील सेंद्रीय पदार्थ कुजवीण्यासाठी एकरी १-२ लिटर सन बायो कॉम्पॅक्ट ठीबक सिंचनामधुन वापरावे.

उपलब्धता

१००० मीली / ५००० मीली / १ किलो

Back to Top