सन बायो डर्मा-एच (Trichoderma harzianum)

CFU:Trichoderma harzianum (1 x 108 Cells / ml)

सन बायो डर्मा-एच मध्ये असलेली Trichoderma harzianum ही बुरशी एक उत्कृष्ठ जैविक बुरशीनाशक व सुत्रकृमीनाशक आहे. पिकांवर येणार्‍या विविध प्रकारच्या बुरशी तसेच सुत्रकृमींच्या व्यवस्थापनासाठी सन बायो डर्मा-एच उपयुक्त आहे. सुत्रकृमी व्यवस्थापनासाठी या बुरशीचा प्रामुख्याने वापर केला जातो.

सन बायो डर्मा-एच ची कार्यपद्धती

  • पिकांवरील मर, खोडकूज, मूळकूज, पानांवरील डाग यांचा प्रतीबंध होतो.
  • मनुष्य व पाळीव प्राण्यांसाठी पूर्णतः सुरक्षीत.
  • सन बायो डर्मा-एच मधून उत्सर्जन होणारी काही द्रव्ये पिक वाढीस चालना देतात. जेणेकरुन सुरुवातीच्या काळामध्ये पिकांची भरघोस वाढ होते.
  • जमीनीतील सेंद्रिय पदार्थ वेगाने कुजवीण्यासाठी सन बायो डर्मा-एच उपयोगी आहे
  • सन बायो डर्मा-एच च्या वापराने दिर्घकाळापर्यंत फायदे मिळतात.

वापरण्याचे प्रमाण

जमिनीतून

प्रती एकर १ ते २ लिटर सन बायो डर्मा एच १०० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून द्यावे..

ठिबक सिंचनामधून

प्रती एकर १ लिटर सन बायो डर्मा एच ठिबक सिंचनाद्वारे मुळांशी द्यावे.

आळवणीसाठी

५ ते १० मिली सन बायो डर्मा एच प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी.

फवारणीमधून

५ मिली प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशीरा फवारणी करावी.

सन बायो डर्मा - एच वापरण्याच्या अगोदर व नंतर कुठल्याही रासायनिक बुरशीनाशकाचा वापर करू नये.

उपलब्धता

१ लिटर / ५ लिटर

Back to Top