सन बायो डर्मा (Trichoderma viride)

Trichoderma viride (1 x 108 Cells / ml)

ट्रायकोडर्मा ही एक बहूपयोगी परोपजीवी हरितद्रव्यविरहीत बुरशी असून जमिनीतील विविध प्रकारच्या रोगकारक बुरशींवर आपली उपजिवीका करते. जमिनीत ट्रायकोडर्माच्या विविध प्रजाती असून त्यांपैकी व्हिरीडी आणि हर्जियानम या दोन प्रजाती डाळींब, संत्रा, आले, कापूस, डाळवर्गीय पिके, तेलबीया यांच्यावरील मर आणि मुळकूज या रोगांस प्रतीबंध करण्यासाठी परिणामकारक आढळून आल्या आहेत. द्राक्षावरील डाऊनी मिल्ड्यू, भूरी तसेच मणीकूज यावरही प्रभावी नियंत्रण मिळवता येते.

सन बायो डर्मा ची कार्यपद्धती

  • सन बायो डर्मा बुरशीची वाढ रोगकारक बुरशींपेक्षा वेगाने होत असल्याने रोगकारक बुरशींचे तंतू पुर्णपणे झाकले जाऊन त्यांची वाढ खुंटते.
  • सन बायो डर्मा बुरशीचे तंतू रोगकारक बुरशींच्या तंतूभोवती घट्ट गुंडाळले जातात व शेवटी रोगकारक बुरशींच्या तंतूंमध्ये शिरून त्यांचा नायनाट करतात.
  • सन बायो डर्मा बुरशी वाढताना प्रतिजैविके तयार करते. या प्रतिजैविकांचा रोगकारक बुरशींच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होऊन मर व मुळकूज या रोगांचे नियंत्रण होते.
  • प्रतिजैवीकांप्रमाणेच सन बायो डर्मा चार प्रकारची विकरे तयार करते. ही विकरे रोगकारक बुरशींच्या पेशीभित्तीका नष्ट करून त्यांच्यावर नियंत्रण मिळवतात.
  • सन बायो डर्मा बुरशी रोगकारक बुरशींबरोबर अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा करते. पर्यायाने रोगकारक बुरशींना अन्नपुरवठा कमी होऊन त्यांच्या वाढीवर नियंत्रण येते.
  • सन बायो डर्मा बुरशी रोगनियंत्रणाबरोबरच जमिनीतील सेंद्रिय पदार्थांच्या कुजण्याच्या प्रक्रियेत मदत करते.
  • सन बायो डर्मा बुरशी पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी संजीवके तयार करते. ही संजीवके पिकांच्या वाढीसाठी उपयोगी पडतात.

वापरण्याचे प्रमाण

जमिनीतून

प्रती एकर १ ते २ लिटर सन बायो डर्मा १०० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून द्यावे.

ठिबक सिंचनामधून

प्रती एकर १ लिटर सन बायो डर्मा ठिबक सिंचनाद्वारे मुळांशी द्यावे.

आळवणीसाठी

५ ते १० मिली सन बायो डर्मा प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी.

फवारणीमधून

५ मिली प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशीरा फवारणी करावी.

सन बायो डर्मा वापरण्याच्या अगोदर व नंतर कुठल्याही रासायनिक बुरशीनाशकाचा वापर करू नये.

उपलब्धता

१००० मिली / ५००० मिली

Back to Top